Home | International | Other Country | jeff bezos mac kenzie divorce: National enquirer blames pics send to mistress lauren sanchez

घटस्फोट/ अमेझॉनच्या सीईओचे माजी टीव्ही अँकरसोबत संबंध, 455 कोटींच्या प्रायव्हेट जेटमध्ये तिला घेऊन प्रवास 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 11:56 AM IST

- अमेरिकेच्या द एनक्वाइरर मॅग्झीनने गुरुवारी केला हा दावा 

 • jeff bezos mac kenzie divorce: National enquirer blames pics send to mistress lauren sanchez

  वॉशिंगटन. अमेरिकी मॅग्झीन द एनक्वाइररच्या दाव्यानुसार अमेझॉनचे सीईओ बेजोस (55) चे घटस्फोट घेण्याचे कारण माजी टीव्ही अँकर लॉरेन सांचेज(49) आहेत. बेजोस आणि सांचेज गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. लॉरेन पती पॅट्रिक वाइटसेलपासून वेगळी झाली आहे. वाइटसेल हॉलिवूड एंजेंसी डब्ल्यूएमचीचे सीईओ आहेत. बेजोस 2 वर्षांपुर्वी वाइटसेलच्या माध्यमातूनच सांचेजला भेटले होते. वाइटसेल आणि बेजोस मित्र आहेत.
  द एनक्वाइररनुसार, गेल्या 4 महिन्यांपासून त्यांच्या टीमने बेजोसला 5 राज्यांमध्ये 40,000 मील अंतरापर्यंत ट्रॅक केले. बेजोस 455 कोटी रुपयांच्या आपल्या प्रायव्हेट जेटमध्ये सांचेजला अनेक शहरांमध्ये घेऊन गेले. मॅग्झीनने या गोष्टींचा पुरावा असल्याचाही दावा केला आहे.

  मॅग्झीनने दावा केला की, बेजोस आणि सांचेजची रिलेशनशिपचे वृत्त गुरुवारी प्रकाशित होणार होते. त्यांनी आपला रिपोर्ट बेजोसच्या प्रतिनिधींजवळ टिप्पणीसाठी पाठवला होता. पण, बेजोसने रिपोर्ट प्रकाशित होण्यापुर्वी बुधवारी पत्नी मैकेंजीसोबत घटस्फोटाची घोषणा केली.

  बेजोसने सांचेजला आपत्तीजनक फोटो पाठवले : रिपोर्ट
  1. द एनक्वाइररची पेरेंट कंपनी अमेरिकन मीडिया इंकने गुरुवारी दावा केला की, त्यांच्या इन्वेस्टिगेशनमुळे बेजोसला सार्वजनिकरित्या घटस्फोटाची घोषणा करावी लागली. बेजोस आणि त्यांची पत्नी मैकेंजीने बुधवारी ट्विटरच्या माध्यमातून ते घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले होते.


  2. अमेरिकेतील मॅग्झीनने दावा केला आहे की, गेल्या काही महिन्यांमध्ये बेजोसने सांचेजला अनेक आपत्तीजनक फोटोज आणि मॅसेज पाठवले आहे. मॅग्झीननुसार, ते 11 पेजच्या रिपोर्टमध्ये सर्व फोटोज दर्शकांपर्यंत पाठवणार आहेत.

  डोनाल्ड ट्रम्पचे जवळचे आहेत अमेरिकी मीडिया इंकचे मालक
  3. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, द एनक्वाइरर हॉलिवूडच्या लोकांच्या सनसनी रिपोर्टिंगसाठी ओळखले जाते. पण, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पमुळे बेजोसची रिपोर्टिंग होऊ शकते असे बोलले जातेय.


  4. ट्रम्पने अनेक वेळा अमेझॉनची निंदा केली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या विरुध्दच्या वॉशिंगटन पोस्टच्या रिपोर्टिंगविषयी बेजोसवर निशाना साधला आहे. बेजोस वॉशिंगटन पोस्टचेही मालक आहेत.


  5. द एनक्वाइररची पेरेंट कंपनी अमेरिकन मीडिया इंकचे मालक डेविड पेकरसोबत ट्रम्प यांचे चांगले नाते आहे. ट्रम्प यांच्या विरुध्द प्रकाशित झालेल्या बातम्या दाबण्यासाठी पेकर ट्रम्प आणि त्यांचे पूर्व वकीलासोबत 2016 मध्ये काम केले आहे. त्यांची कंपनी अमेरिकन मीडिया इंकने ट्रम्पविषयी पॉझिटिव्ह बातम्याही प्रकाशित केल्या होत्या.


Trending