आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझे वडील वयाच्या 16 व्या वर्षी क्यूबाहून अमेरिकेत आले होते, त्यांची जिद्द माझ्यासाठी प्रेरणादायी - जेफ बेजोस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - जगतील सर्वांत श्रीमंत व्यक्ती अॅमेझॉनचे फाउंडर जेफ बेजोसने त्यांचे वडील माइक बेजोस यांच्या संघर्षाची गोष्ट शेअर केली आहे. जेफने सांगितले की, वयाच्या 16 व्या वर्षी त्याचे वडील क्यूबाहून एकटेच फ्लोरिडाला आले होते. 1962 मध्ये अमेरिकेत आल्यानंतर ते स्पॅनिशच बोलत आहे. त्यांची हिंमत, दृढ निश्चय आणि आशावाद खूपच प्रेरणादायक आहे.  

 

3 शर्ट, 3 पँट घेऊन अमेरिकेत आले होते वडील -  जेफ बेजोस
जेफ सांगतात की, त्यावेळची कल्पना करणे खूप अवघड आहे. माझे वडील तीन शर्ट आणि तीन पँट घेऊन अमेरिकेत आले होते. फिदेल कास्त्रोच्या शासनात सुरक्षित वाटत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अमेरिकेत पाठवले होते. 

 

 

जेफच्या वडिलांना मिळाला लिबर्टी स्टार किताब
जेफ बेजोसने आपल्या वडिलांच्या प्रवासाचा व्हिडिओ शेअर करत सांगितले की, 'लोक कशाप्रकारे सोबत येऊन एकमेकांना मदत करत होते. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या नवीन संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी बेजोसने हा व्हिडिओ शेअर केला. 15 मे रोजी संग्रहालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात जेफ बेजोस यांच्या वडिलांना लिबर्टी स्टार हा किताब मिळाला.

 

अॅमेझॉनच्या यशात माइकचा मोठा वाटा

माइक हे जेफचे बायोलॉजिकल वडीन नाहीयेत. पण अॅमेझॉनच्या यशामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. जेफची आई जॅकलिन गाइजने 1968 मध्ये माइक बेजोस सोबत लग्न केले होते. त्यावेळी जेफ फक्त 4 वर्षांचे होते. जॅकलिनने 1965 मध्ये पहिला पती टेड जॉर्गनसनशी घटस्फोट घेतला होता. 

बातम्या आणखी आहेत...