आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेफ बेजोस यांनी सांगितले आपल्या यशाचे रहस्य, अशाप्रकारे बिझनेसचे प्लानिंग करण्याचा दिला सल्ला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्‍ली  : आजच्या घडीला अॅमेझॉन मार्केट कॅपिटलायझेनसमध्ये जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. सोमवारी अॅमेझॉनने व्यापरामध्ये बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्टला पिछीडीवर टाकले आहे. अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांनी आपल्या व्यवसायात बरीच वाढ बघितली आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी जी झेप घेतली आहे त्यावरून प्रत्येक नवीन व्यवसायिकासाठी ते एक आदर्श ठरले आहेत. जगतील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी सोबतच अॅमेझॉनने क्लाउड कंप्‍यूटिंगमध्ये देखील आपला दबदबा ठेवला आहे. जेफ बेजोस यांना मिळणाऱ्या यशामुळे नोव्हेंबर 2017 मध्ये .त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. 
 

जेफ बेजोस यांच्या यशाचे रहस्य  

आज प्रत्येकालाच जेफ यांच्या यशाच्या रहस्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यांची व्यवसायात होणारी वाढ आणि लोकप्रियतेच्या मागे कोणते गणित आहे याबाबत सर्वांच्याच मनात एक उत्कंठा आहे. बेजोस यांनी एका मुलाखतीत आपल्या अशाच एका रणनितीचा उल्लेख केला. यामुळे त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. आज आम्ही तुम्हाला बेजोस यांच्या त्या रणनितीबद्दल सांगत आहोत. 

 

अस्तित्वात असलेल्या गोष्टीला आणखी उत्कृष्ट करून यशस्वी होता येते 

दरवेळी नवीन करण्यात येणारी गोष्टच आपल्याला यशस्वी बनवत नसते. कारण आपण जे आहात त्याला आणखी चांगल्या प्रकारे घडवून यश मिळवता येत असल्याचे बेजोस यांनी सांगितले. पुढ त्यांनी सांगितले की, लोक एकच प्रश्न विचारतात की, येणाऱ्या 10 वर्षात कोणते बदल होणार आहेत. हा एक रंजक प्रश्न आहे पण याहूनही दुसरा रंजक प्रश्न असा की, पुढील 10 वर्षात काय बदलणार नाही. बेजोस यांच्या मते दुसरा प्रश्न हा महत्तपूर्ण आहे. बदलत्या काळानुसार ज्या गोष्टीत बदल होणार नाही अशा गोष्टी लक्षात घेऊन व्यवसायाची रणनिती आखावी असे त्यांनी सांगितले. 


अशाप्रकारे तयार केले बिझनेस मॉडल

अॅमेझॉनने नवीन ट्रेंड किंवा नवीन प्रयोगावर जास्त लक्ष न देता, आधीच्याच गोष्टी आणि सुविधांना उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या गरजा आणि त्या गरजांना नवीन काळात कशाप्रकारे पूर्ण करता येईल यावर लक्ष देऊन आपले बिझनेस मॉडल तयार केले आहे. 

 

लोकांच्या या आवश्यकतेकडे दिले लक्ष
बेजोस यांनी सांगितले की, लोकांनी कमी किमतीचे सामान आणि त्यांचे तात्काळ वितरण व्हावे हीच लोकांची अपेक्षा होते. तसेच लोकांना एकापेक्षा अधिक निवड पाहिजे. आजच्या 10 वर्षांपूर्वी याच गरजा होत्या आणि 10 वर्षांनंतरही याच गरजा राहणार आहे. आम्ही याच गरजा लक्षात घेऊऩ आम्ही आमचे व्यवसाय धोरण अंगिकारले असल्याचे बेजोस यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...