आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - गत पाच महिन्यांत क्रिकेटच्या विश्वात जगाच्या कानाकाेपऱ्यात ज्या गाेलंदाजाच्या नावाची चर्चा रंगली, ताे म्हणजे इंग्लंडचा जाेफ्रा आर्चर. विंडीजच्या बार्बाडाेस येथे जन्मलेला हा २४ वर्षीय युवा गाेलंदाज सध्या विश्वविजेत्या इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने गत पाच महिन्यांतील लक्षवेधी कामगिरीच्या बळावर अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष आपल्याकडे खेेचून घेतले आहे.
आता प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेतील दुुसऱ्या कसाेटीत ताे अधिकच चर्चेत आला. या वेगवान गाेलंदाजाच्या वाऱ्याच्या वेगाने आलेल्या चेंडूने दुसऱ्या कसाेटीत ऑस्ट्रेलियाच्या स्मिथला गंभीर जखमी केले. याच दुखापतीमुळे स्मिथला या कसाेटीतून बाहेर जावे लागले. त्याची करिअरमधील ही पदार्पणातील कसाेटी ठरली. या पहिल्याच कसाेटी त्याने भन्नाट वेगाने सर्वांनाच आश्चर्याचा माेठा धक्का दिला. त्याची आयपीएलमधील कामगिरीही काैतुकास्पद ठरली. राजस्थान राॅयल्सचे प्रतिनिधित्व करताना त्याने ११ सामन्यांत ११ विकेट घेण्याचा पराक्रम केला.
मजबूत बांध्यामुळे १४० सेंमीपर्यंत बाउन्स व १४८ किमीचा वेग
इंग्लंडच्या प्रतिभावंत जाेफ्रा आर्चरची वेगवान गाेलंदाजीही इतरांपेक्षा वेगळ्या शैलीतील आहे. त्यामुळे त्याच्या या गाेलंदाजीचा रनअप हा ब्रेट ली किंवा शाेएब अख्तरसारखा वेगवानही नाही आणि लांबही नाही. तसेही माॅडर्न क्रिकेटमध्ये वेगवान गाेलंदाज हे फिटनेस व स्टॅमिनासाठी छाेट्या रनअपवरून अधिक स्पीड घेण्यावर भर देतात. पूर्वीचे गाेलंदाज १७ ते २० यार्डपर्यंतचा रनअप घेत हाेते. मात्र, आता जसप्रीत बुमराह आणि जाेफ्रा आर्चरसारखे गाेलंदाज १५ यार्डपर्यंतचा रनअप घेतात. यामुळे फलंदाजाला १४५ + किमीच्या वेगाने येणाऱ्या चेंडूचा सामना करावा लागताे. याशिवाय त्याचा आखूूड टप्प्याचा चेंडू १४० सेंमीपर्यंत उसळी मारताे.
१९३० मधील डावपेच आता इंग्लंडने स्मिथविरुद्ध वापरले
स्मिथविरुद्ध इंग्लंडची गाेलंदाजी ही १९३० मधील डावपेचांसारखीच ठरली, अशी प्रतिक्रिया नासिर हुसेन यांनी दिली. या गाेलंदाजीने अंगावर काटा उभा केला. यातून १९३० मधील गाेलंदाजी आठवली. कारण, या दशकात डग्लस जाॅर्डिन यांनी प्रख्यात डाॅन ब्रॅडमॅन यांन राेखण्यासाठी शरीराला दुखापत करणाऱ्या गाेलंदाजी डावपेचाचा वापर केला हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.