आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या ऑरलँडोमध्ये एक महिला विना तिकीट डेल्टा एअरलाइनच्या फ्लाइट नंबर 1516 मध्ये चढली. जेनी क्लेमन्सला तीन तासांनंतर विमानातून बाहेर काढण्यात आले. तिच्या या हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे विमानाला 4 तासांचा उशीर झाला. महिला इतक्या कडक सुरक्षेनंतरही विमानात विना तिकीट कशी चढली, याचा अधिकारी तपास घेत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, ऑरलँडो इंटरनॅशनल एअरपोर्टवर डेल्टा फ्लाइट अटलांटाला रवाना होणार होती. तेव्ही जेनी इतर प्रवाशांप्रमाणे सीटवर जाऊन बसली. त्यानंतर विमानातील क्रूने बोर्डिंग पास मागितला, तर महिला म्हणाली, बोर्डिंग पास नाहीये, मी फेकून दिला.
एअरलाइनने मागितली माफी
तिच्या या ड्राम्यानंतर तिला बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलवावे लागले. एअरपोर्ट प्रशासनाने सुरक्षेतील या निष्काळजीपणामुळे आणि फ्लाइटला उशीर झाल्यामुळे प्रवाशांची माफी मागितली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.