आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेनिफर विंगेट दिसणार पारंपरिक मराठी वेशभूषेत, 'बेहद 2'च्या निमित्ताने पहिल्यांदाच परिधान केली नऊवारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः अत्यंत चर्चेत असलेल्या ‘बेहद 2’ या मालिकेने भारतीय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बेहदच्या पहिल्या सीझनमध्ये प्रेमात वेड्या झालेल्या मुलीच्या रूपात दिसलेली जेनिफर विंगेट आणखी जास्त उग्र अवतरात परतली. यातील एका दृश्यात माया मराठी मुलीच्या रूपात पारंपरिक मराठी वेशभूषेत दिसणार आहे. 

हा पोशाख पहिल्यांदाच परिधान करत असल्याचा आपला उत्साह न लपवता जेनिफर म्हणाली, “पहिल्यांदा कधीच न घातलेला पोशाख घालण्याबाबत मी खूप रोमांचित होते, विशेषतः, बेहद सारख्या मालिकेत माया असा पोशाख परिधान करेल, अशी अपेक्षाच कोणी केली नसेल. मला त्या पोषाखात पाहून माझ्या सकट सर्वांना खूप आनंद झाला. मी तर तो पोशाख घालूनच घरी गेले. मी तो पोशाख यापूर्वी कधीच परिधान केला नव्हता, त्यामुळे माझ्या आईने त्या पोषाखात मला बघावे अशी माझी इच्छा होती. मला त्या वेषात बघून ती खूप खुश झाली.

बातम्या आणखी आहेत...