आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेनिफर विंगेटच्या रोमँटिक थ्रिलर 'बेहद 2' चा नवीन प्रोमो रिलीज, पुन्हा एकदा दिसणार 'माया'चा जलवा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः जेव्हा तुम्ही आंधळेपणाने सूडाचा पाठपुरावा करता, तेव्हा चूक आणि बरोबर यांच्यातली सीमारेषा पुसट होत जाते. हा सूड आपल्या डोळ्यात घेऊन 2 डिसेंबर रोजी परतण्यासाठी माया  सज्ज झाली आहे. दर सोम ते शुक्र रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर 'बेहद'चा कोराकरकरीत दुसरा भाग सुरू होत आहे. LSD प्रॉडक्शन्सद्वारा निर्मित ही मालिका भारतीय टेलिव्हिजनवर डार्क थरारनाट्याचा दर्जा नक्कीच आणखी उंचावेल.

  • ही आहे मालिकेची स्टोरी लाइन ...

निनाविपणा जेथे एक चैन आहे, त्या सध्याच्या सोशल मीडियाच्या युगातली ही रहस्यांची आणि फसवणुकीची कहाणी आहे. बेहदच्या मागच्या सत्रात मायाच्या वेड्या प्रेमामुळे ती प्रेक्षकांना भावली होती. ती आता नव्या भागात गूढ आणि आकर्षक अवतारात दिसणार आहे. जेनिफर विंगेट ही माया जयसिंग नामक एका मायावी आणि थरारकथा लिहिणार्‍या लेखिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिची पहिली कादंबरी बेस्टसेलर होते व तिला अतोनात प्रसिद्धी मिळते पण तरी कोणीही तिचा चेहरा कधीच पाहिलेला नसतो. सोशल मीडियावर तिची हजेरी कुठेच नाही व तिची ओळख उघड झालेली नाही. यावेळी ही कथा आहे प्रेम निघून गेलेल्या एका मनाची, जे मन आता निष्पाप न राहता क्रूर झाले आहे. ही गोष्ट आहे मायाची, जिला सूड घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही  आणि जे कोणी तिच्या या इप्सिताच्या आड येईल, त्याची तमा बाळगली जाणार नाही!

या संपूर्ण सत्रात माया काळ्या वस्त्रांत दिसणार आहे. ती अत्यंत सावध, अनाकलनीय आणि हिशोबी असणार आहे. या मालिकेत आशीष चौधरीची महत्त्वाची भूमिका असून त्याने करोडपती मृत्युंजय रॉय म्हणजे MJ ची भूमिका साकारली आहे. त्याच्या मते पैशाने सारे काही विकत घेता येऊ शकते. त्याचा असा समज आहे की, तो अजिंक्य आहे व कोणावरही वर्चस्व गाजवण्यास समर्थ आहे. पण तो पापभीरू आहे आणि रुद्र (शिविन अभिनीत) व ऋषी (रजत वर्मा अभिनीत) या आपल्या दोन मुलांवर त्याचे प्रेम आहे. रुद्र देखणा आकर्षक तरुण आहे, ज्याची पूर्वी प्रेमात फसवणूक झाली आहे तर ऋषी एक आनंदी, अवखळ मुलगा आहे. माया या दोन्ही भावांना नादी लावणार आहे. रुद्राचा आता प्रेम या गोष्टीवरचा विश्वास उडालेला आहे,  तरीही त्याला माया आवडते पण तिला प्राप्त करणे सोपे नाही. एक आव्हान म्हणून तो तिच्याकडे पाहतो आहे. ऋषीसाठी मात्र माया एक सरळसाधी वयस्क स्त्री, संकटात सापडलेली स्त्री आहे जिच्यासाठी तो पागल झाला आहे. पण या दोघांनाही उध्वस्त करण्यासाठी माया चाल खेळते. पण दोन्ही भावांना एकाच वेळी ती का खेळवते आहे? भूतकाळात असे काय घडले आहे की, ज्यामुळे तिच्यात इतका तिरस्कार भरला आहे? तिचे हे सूडनाट्य कुठे जाऊन थांबणार? तिच्या सूडाच्या मार्गातली ही केवळ प्यादी आहेत का? आपल्या सूडाची योजना ती कशी आखते आणि का? या प्रश्नांची उत्तरे या मालिकेत मिळणार आहेत. 

  • माया जयसिंह ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री जेनिफर विंगेट

मालिकेतील भूमिकेविषयी जेनिफर म्हणते, "माया हे काही आता केवळ एक पात्र उरलेले नाही तर ती एक भावना झाली आहे. पहिल्या सत्रात आम्हाला जे अपार प्रेम मिळाले त्यामुळेच आम्ही यंदा आणखी अस्वस्थ, बोल्ड आणि रहस्यमयी माया घेऊन येण्यासाठी प्रोत्साहित झालो आहोत. यावेळी सूड घेण्यासाठी आम्ही कोणतीही परिसीमा गाठू."

  • मृत्युंजय रॉय म्हणजे MJ ची भूमिका साकारतोय अभिनेता आशीष चौधरी

भूमिकेविषयी आशीष म्हणतो, "जेव्हा मी या मालिकेची पटकथा पहिल्यांदा पाहिली, तेव्हाच मला माहीत झाले होते की, मला ती आवडणार आहे, कारण तिच्यात खूप शक्यता दिसत होत्या. मी MJ या कोट्याधीशाची भूमिका करत आहे, ज्याला पैशाचा अहंकार आहे. एक अत्यंत वेगळी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाल्याचा आनंद वाटत आहे. मला या मालिकेची संकल्पना आणि व्यक्तिचित्रण समजले, त्याच क्षणी मी ती भूमिका करण्यास उत्सुक होतो."

  • रुद्र रॉय ही व्यक्तिरेखा साकारतोय अभिनेता शिविन नारंग

शिविन सांगतो, "या मालिकेच्या रूपाने मला नवीन गोष्टी शिकण्याची आणि अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी मी अनेक मालिकांमधून काम केले आहे, पण पहिल्यांदाच मी थरारनाट्य करतो आहे. जेनिफर आणि आशीष यांसारख्या या उद्योगातील कुशल आणि अनुभवी अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे."

या मालिकेत भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील मोठमोठी नावे सामील आहेत. मेलेनी नझरत अंतराची म्हणजे MJ च्या पत्नीची भूमिका करणार आहे, तर रूपा दिवेटिया नीलांजना रॉय म्हणजे MJ च्या सासूच्या भूमिकेत दिसणार आहे. या रॉय कुटुंबियांशिवाय, इतर कलाकार आहेत. निकुंज मलिक दीयाच्या भूमिकेत, हसन झैदी व गुरप्रीत बेदिया अनुक्रमे आमीर आणि नरगिसच्या भूमिकेत, पारस मदान राजीव ही व्यक्तिरेखा सकारणार आहे तर प्रीती मेहरा नंदिनी जयसिंह म्हणजे मायाच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. हर्ष चतर्थ जोगीच्या आणि कंगन नांगिया अनन्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.