आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : 'कबीर सिंह' सारख्या दमदार यशानंतर शाहिद कपूर अपकमिंग प्रोजेक्ट्सला खूप गंभीरतेने घेत आहे. कोणत्याही परिस्थितीत शूट अफेक्ट होऊ देत नाही. त्याच्या समर्पणाचे ताजे उदाहरण 'जर्सी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाहायला मिळाले. चंदीगडमध्ये शूटिंगदरम्यान तिथे पारा दोन अंश सेल्सियस पर्यंत घसरला होता. असे असतानाही शाहिदने आउटडोअर शूट कोणत्याही तक्रारीविना पूर्ण केले.
दिग्दर्शक गौतम तिन्ननुरीने त्याचे कौतुक करत सांगितले, शाहिद खूप प्रोफेशनल आहे. डिसेंबरदरम्यान बहुतांश शूटिंग आउटडोअर किंवा लाइव्ह ठिकाणांवर करायचे होते, जिथे आम्ही सर्व 3-4 कपड्यांमध्ये होतो, तर शाहिदने आपले सर्वोत्तम प्रदर्शन दिले आणि थंड तापमान असूनही त्याने सीन पूर्ण केला.
प्रोड्यूसर अमन गिलने सांगितले, सर्वानाच याची जाणीव होत होती की, थंडी वादहत आहे. अशा तापमानातही शाहिद पूर्णपणे फोकस्ड होता, त्याने संपूर्ण यूनिटला सपोर्ट केले आणि थंडीमुळे शुटिंगवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. एक प्रोफेशनल कलाकार असल्याच्या नात्याने त्याला या गोष्टीचे महत्व माहित होते की, दिलेल्या वेळेत शूट पूर्ण जाणारे गरजेचे असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.