आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Merry Christmas: याच ठिकाणी येशू ख्रिस्तांचा पुनरजन्म झाल्याची आहे मान्यता; असा दिसतो मकबरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - जगभरात नाताळचा उत्साह सुरू आहे. या निमित्त नेहमीप्रमाणेच जेरुसलेममध्ये येशू ख्रिस्तांच्या मकबऱ्यावर भाविकांनी गर्दी केली. या मकबऱ्याच्या पुनरुत्थानाचे काम गतवर्षीच पूर्ण झाले आहे. 200 वर्षांनंतर ग्रीक रेस्टोरेशन टीमने हे काम केले आहे. ही जागा 'चर्च ऑफ द होली सेपल्चर' मध्ये आहे. याच चर्चमध्ये असलेल्या दगडांत येशू ख्रिस्तांना दफन करण्यात आले होते. याच ठिकाणी येशू ख्रिस्तांचा पुनरजन्म झाला होता अशी अख्खायिका आहे.


रेस्टोरेशनचे काम सुरू होण्यापूर्वी या संपूर्ण परिसराला काळ्या कपड्यांमध्ये झाकण्यात आले होते. येथील बांधकाम खूपच पडीक झाले होते. त्यामुळे, डागडुजीच्या वेळी संपूर्ण मकबरा जमीनदोस्त होईल अशी भिती निर्माण झाली होती. वर्ल्ड मॉन्युमेंट फंडचे बोनी बुर्नहॅम यांनी सांगितल्याप्रमाणे, वेळीच याच्या दुरुस्तीचे काम केले नसते, तर खरोखर संपूर्ण बांधकाम कोसळले असते. अखेर रेस्टोरेशननंतर मकबरा सुरक्षित झाला आहे. चर्च ऑफ द होली स्पल्चरमध्ये असलेल्या या मकबऱ्याचे बांधकाम लाइमस्टोन आणि मार्बलचे आहे. रेस्टोरेशनमध्ये जवळपास 26 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हा खर्च साऱ्या जगातून आलेल्या दानातून करण्यात आला.


येशू ख्रिस्तांना सुनावला होता मृत्यूदंड
ज्यू समुदायाच्या सर्वोच्च धर्माध्यक्ष आणि ज्यूंच्या सुप्रीम काउन्सिलने येशू ख्रिस्तांना ईशनिंदा (धर्मद्रोह) प्रकरणी दोषी ठरवून मृत्यूदंड सुनावला होता. याच ठिकाणी त्यांना सुळावर चढवण्यात आले होते. यानंतर त्यांना चर्च ऑफ होली स्पल्चरमध्येच दफन करण्यात आले होते. या जागेचा शोध चौथ्या शतकात लागला होता. ख्रिश्चन धर्मियांसाठी हे जगातील सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे. तसेच जगभरातून ख्रिस्ती अनुयायी या स्थळाला भेट देतात. या जागेला गोलगोथा आणि द प्लेस ऑफ स्कल या नावांनीही ओळखल्या जाते.


येशू ख्रिस्तांचा या ठिकाणी पुनरजन्माची मान्यता
याच जागेच्या शेजारी ज्यू समुदायासाठी सर्वात पवित्र अशी 'वॉल' आहे. येशू ख्रिस्तांना दफन केल्यानंतर या परिसराभोवती भिंती घेरण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीला ख्रिस्ती अनुयायी याच ठिकाणी येशू ख्रिस्तांचा पुनरजन्म झाल्याचे मानतात. गार्डन टॉम्बचा शोध 1867 मध्ये लागला. 1894 गार्डन टॉम्ब आणि आस-पासचे परिसर धार्मिक स्थळ म्हणून सुरक्षित करण्यात आले.


पुढील स्लाइड्सवर पाहा, या पवित्र ठिकाणाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...