आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jesse Dufton Becmae First Blind Climber To Climb 450 Feet High Hill 'Old Man Of High'

450 फूट ऊंच डोंगर चढणारा पहिला दृष्टीहीन क्लायंबर बनला जेसी, अवघ्या 7 तासात चढाई पूर्ण केली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटेनच्या जेसी डफ्टनने ओल्ड मॅन ऑफ हॉय डोंगर चढला

एडिनबर्ग- ब्रिटेनच्या जेसी डफ्टनने स्कॉटलँडमधील 'ओल्ड मॅन ऑफ हॉय'डोंगरावर चढाई करणारा जगातिल पहिला ब्लाइंड क्लायंबर बनला आहे. जेसीने 450 फूट ऊंच डोंगर अवघ्या 7 तासात सर केला. त्याला चढाई पूर्ण करण्यासाठी जेसीची होणारी बायको मॉली थॉम्प्सनने त्याला हेडसेट लावून वॉइस कमांड देत मदत केली. जेसी आणि थॉम्प्सन 2004 पासूनच सोबत क्लायंबिंग करत आहेत. लाल खडकापासून बनलेला हा डोंगर स्कॉटलँडमधील नॉर्थ कोस्टमध्ये आहे. जेसीने सांगितले की, 'हा डोंगर रिमोट एरियामध्ये आहे, त्यामुले चढाई करण्या थोडा अडथळा येत होता. हा समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे, या डोंगराला मी निवडले. मी या डोंगरावर चढणारा पहिला ब्लाइंड क्लायंबर आहे. क्लायंबिंग करताना खूप लक्ष केंद्रित करून राहावे लागले. 

जन्माच्या वेळेस जेसीची दृष्टी फक्त 20% होती, आता 1% आहे
 
जन्म झाल्यावर जेसीची दृष्टी फक्त 20% होती. पण, जस-जसे वय वाढले, त्याची दृष्टी कमी होत गेली. आता त्याची पाहण्याची शक्ती फक्त 1 % आहे. जेसीचे वडीलदेखील क्लायंबर आहेत. जेसीने 2 वर्षांचा असताना पहिल्यांदा क्लायंबिंग केली होती. दृष्टी कमी असूनही 16 वर्षांचा होईपर्यंत रग्बी आणि जुजित्सू खेळले.

बातम्या आणखी आहेत...