आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jessica's Murderer Was Powerful So He Just Pleaded Guilty To Life Time Imprisonment Nirbhaya Accused Vinay's Petitions

जेसिकाचा मारेकरी शक्तिशाली म्हणून त्याला फक्त जन्मठेप - निर्भया प्रकरणात दोषी विनयची याचिका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याने फाशीच्या तारखेच्या ११ दिवस आधी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याने गुरुवारी क्युरेटिव्ह याचिका दाखल करतानाच फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये रूपांतरित करण्याची मागणी केली. मागणी करत त्यांनी गुरुवारी एक उपचारात्मक याचिका दाखल केली. सर्वाेच्च न्यायालयासह अन्य सर्व न्यायालयांनी मीडिया आणि राजकारण्यांच्या दबावाखाली पूर्वग्रहदूषित निर्णय घेतल्याचा आराेपही त्याने केला.

विनयने असा दावा केला की गरीब असल्यामुळे आपल्याला मृत्यूची शिक्षा झाली आहे. जेसिका लाल हत्याकांडाचा हवाला देताना त्याने मनू शर्मानेही निर्दयपणे आणि विनाकारण या महिलेची हत्या केली होती. पण एका सामर्थ्यवान राजकीय कुटुंबातून आल्यामुळे त्यांना केवळ जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याचा दावा त्याने केला. विनयने न्यूरोलॉजीचा हवाला देताना सांगितले की, गुन्हेगारीच्या वेळी तरुण त्यांच्या कामाचे मूल्यांकन करण्यास असमर्थ असतात. गुन्ह्याच्या वेळी तो नशेत होता. पीडितेच्या मित्राशीही भांडण झाले. म्हणूनच तो गुन्ह्याचे मूल्यांकन करण्याच्या आणि त्याचे परिणाम समजून घेण्याच्या स्थितीत नव्हता असे ताे म्हणाला.त्याने बलात्कार आणि हत्येची १७ प्रकरणेही काेर्टाला सांगितली, ज्यात मृत्यूची शिक्षा आजीवन कारावासामध्ये रूपांतरित करण्यात आलेली आहे. पटियाला हाऊस काेर्टाने गेल्या सात जानेवारीला निर्भया कांडातील चारही आराेपींसाठी डेथ वाॅरंट जाहीर करतानाच फाशीसाठी २२ जानेवारी राेजी सकाळची ७ वाजेची वेळ निश्चित केली.

यादरम्यान आराेपी क्युरेटिव्ह याचिका आणि दया याचिकेचा कायदेशीर पर्याय वापरू शकताे. ज्येष्ठ वकील जयंत सूद यांच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालय क्युरेटिव्ह याचिकेवर बंद खाेलीत सुनावणी करते. जुन्या गोष्टी ऐकल्या जात नाहीत. केवळ कायदेशीर तथ्ये ऐकली जातात, ज्याअंतर्गत असा दावा केला जातो की निर्णय घेताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले. योग्य गाेष्ट वाटल्यास काेर्ट निर्णय बदलू शकते, अन्यथा याचिका फेटाळून लावली जाते.
 

बातम्या आणखी आहेत...