Home | Business | Business Special | Jet Airvej shall be shut down soon

जेट एअरवेजचे कामकाज पूर्ण ठप्प होण्याची शक्यता;बँकांकडून जेटला पैसे नाहीत, बैठक निष्फळ

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 16, 2019, 11:18 AM IST

संचालक मंडळाची आज पुन्हा बैठक, आंतरराष्ट्रीय विमाने १८ एप्रिलपर्यंत राहणार बंद

 • Jet Airvej shall be shut down soon

  मुंबई- जेट एअरवेज बंद होण्याचा धोका अद्यापही टळलेला नाही. सोमवारी बँकांबरोबर झालेल्या जेट व्यवस्थापनाच्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. तातडीच्या निधीसाठी बँका निर्णय घेऊ शकल्या नाहीत. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी जेटच्या व्यवस्थापनाची पुन्हा बैठक होणार असल्याचे जेटचे सीईओ विनय दुबे यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवादेखील १८ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विमान कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, नवीन प्रवर्तक येईपर्यंत हंंगामी निधी गरजेचा आहे, तोपर्यंत विमान कंपनीचे कामकाज सुरू राहू शकेल. जेट व्यवस्थापनाबरोबर शुक्रवारी झालेल्या बैठकीत बँकांनी जेटकडे नवीन योजना मागितली होती. सोमवारी त्यावर चर्चा झाली. वैमानिक संघटनेच्या एका सदस्याने सांगितले की, आज आम्हाला बँकांकडून काही मदत मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु सध्या आम्ही पैसा देऊ शकत नाही, असे बँकांनी सांगितले. जर उद्यापर्यंत पैसे मिळाले नाहीत तर जेटचे कामकाज पूर्णपणेे बंद होऊ शकते.

  इंधनाच्या पैशासाठी आज दुपारपर्यंतचा वेळ
  जेटकडे इंधनाच्या रकमेची परतफेड करण्यासाठी मंगळवारी दुपारपर्यंतची वेळ आहे. तोपर्यंत जर पैसे मिळाले नाहीत तर पुन्हा इंधन पुरवठा बंद होऊ शकतो. दोन आठवड्यांत कमीत कमी तीन वेळा जेटचा इंधन पुरवठा बंद झाला आहे.


  हप्त्यात रकमेचा जेटला फायदा नाही
  कर्ज पुनर्रचना योजनेंतर्गत जेटला १,५०० कोटी रुपये देण्याची घोषणा बँकांनी २५ मार्चला केली होती. परंतु आतापर्यंत ३०० कोटी रुपये दिले आहेत. ही रक्कम लहान हप्त्यांत देण्यात आली. त्यामुळे त्याचा लाभ झाला नाही.

  जेटच्या रूटसाठी एयर इंडिया व स्पाइसजेटने मागितली
  जेट एअरवेजची आंतरराष्ट्रीय सेवा सातत्याने बंद असताना एअर इंडिया आणि स्पाइसजेट काही मार्गांवर आपल्या विमानफेऱ्या वाढवण्यासाठी इच्छुक आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जर जेट दुबई मार्गावर विमानफेऱ्यांचा साप्ताहिक कोटा पूर्ण करू शकत नसेल तर तो अधिकार आम्हाला द्या, असे दोन्ही विमान कंपन्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाला सांगितले आहे. हे विमानमार्ग खूप नफादायी मानले जातात.

Trending