Home | Business | Business Special | Jet Airways CEO met to Jaitley's, 170 crores demanded to save jet airways

जेट एअरवेजच्या सीईओंनी घेतली जेटली यांची भेट, १७० कोटींची मागणी

वृत्तसंस्था | Update - Apr 21, 2019, 05:12 PM IST

रिलायन्स समूहानेही व्यक्त केली जेटची भागीदारी खरेदीची इच्छा

  • Jet Airways CEO met to Jaitley's, 170 crores demanded to save jet airways

    नवी दिल्ली - आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या जेट एअरवेजचे सीईआे विनय दुबे यांनी शनिवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार देण्यासाठी त्यांनी अर्थमंत्र्यांकडे १७० काेटी रुपयांची मागणी केली आहे. तर जेटच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रपती रामनाथ काेविंद आणि पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पगार आणि थकबाकी देण्यासाठी अपील करत पत्र पाठवले आहे. यादरम्यान एका मीडिया वृत्तानुसार मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने जेट एअरवेजमध्ये भागीदारी खरेदीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. वास्तविक जेट एअरवेजचे अधिग्रहण करण्यासाठी रिलायन्सने लेंडर्सला “एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट’ दिलेला नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स बाेलीमध्ये समावेश असलेल्या एतिहाद एअरवेजच्या बाेलीमध्ये नंतरही सहभागी हाेऊ शकते.

    एतिहादची सध्या जेट एअरवेजमध्ये २४ टक्के भागीदारी आहे. सरकारच्या मंजुरीमुळे ही कंपनी जेटमध्ये ४९ टक्क्यांपर्यंत भागीदारी वाढवू शकते. रिलायन्सने एअर इंडियाच्या पूर्ण प्राेत्साहन योजनेत रुची दाखवली हाेती. असे असले तरी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांनी सांगितले की,”आम्ही मीडियाचा अंदाज आणि अफवा यांवर टिप्पणी करत नाही. आमची कंपनी वारंवार नवनवीन संधींचा शाेध घेऊन त्याचे मूल्यांकन करत असते. आम्हाला जेव्हा आणि ज्या ठिकाणी आवश्यकता वाटेल, तेव्हा याची माहिती देण्यात येर्इल.’


    जेटलींनी दिले बँकांशी चर्चा करण्याचे आश्वासन :
    जेट एअरवेजवरील कर्जाची वसुली करण्यासाठी ज्या बँकांनी बाेली मागितली आहे, त्या बँकांशी चर्चा करण्याचे आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहे. कंपनीला पगारासाठी १७० काेटी रुपयांची आवश्यकता आहे. कंपनीच्या पायलटांचा साडेतीन महिन्यांपासून तर इंजिनिअर्सना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.

Trending