जेटच्या पुनरुत्थानाची शक्यता कमी, तत्काळ 10,000 काेटी लागतील

नवे प्रवर्तक आल्यानंतरही पुन्हा सेवा सुरू हाेण्यास लागतील तीन महिने

दिव्य मराठी

Apr 23,2019 11:01:00 AM IST

मुंबई - जेट एअरवेजच्या पुनरुत्थानाची शक्यता कमीच असल्याचे दिसत आहे. कंपनीला पुन्हा सुरू करण्यासाठी बँकांचे कर्ज, कर्मचाऱ्यांचा पगार, व्हेंडर आणि विमान भाडे भरावे लागणार आहे. एअर इंडियाचे माजी र्इडी आणि या क्षेत्रातील तज्ञ जितेंद्र भार्गव यांनी सांगितले की, जेट वाचवण्यासाठी संचालकाला तत्काळ कमीत कमी १०,००० काेटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. तेदेखील बँकांनी ८,५०० काेटी रुपयांपैकी जर अर्धा खर्च माफ केला तरच. यासंबंधी १० मे राेजीच स्थिती स्पष्ट हाेर्इल. नवीन प्रवर्तक आल्यानंतरही जेटच्या पुनरुत्थानासाठी कमीत कमी तीन महिने लागतील.


सरकार जेटचे स्लाॅट दुसऱ्या एअरलाइन्स कंपन्यांना देत आहे. क्षमता वाढवण्यासाठी एअर इंडिया, इंडिगाे आणि स्पाइसजेटसारख्या कंपन्या जेटची उभी विमाने भाडेतत्त्वावर घेत आहेत. सुट्यांच्या हंगामात प्रवाशांना त्रास हाेऊ नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यामुळे जेटच्या पुनरुत्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे. यामुळे लिलावात कंपन्या कमी रस दाखवतील किंवा अत्यंत कमी बाेली लागेल. वास्तविक जेटच्या एका संचालकाने सांगितले की, दुसऱ्या एअरलाइन्सला देण्यात आलेले स्लाॅट अस्थायी स्वरूपात देण्यात आलेले आहेत. जेटचे ४४० स्लाॅट इतर एअरलाइन्सला दिले जाणार असल्याचे नागरी उड्डयन सचिव प्रदीप सिंह यांनी सांगितले हाेेते. हे स्लाॅट आधी तीन महिन्यांसाठी आणि नंतर एक-एक महिन्यासाठी वाढवले जातील. चांगला निर्णय : वंेकटचलम यांनी सांगितले की, बँकांच्या समूहाने कर्ज देण्यास घार्इ केली नाही, ताे निर्णय योग्यच हाेता. त्यांनी सांगितले की, आमच्या मते, जर जेटला टेकआेव्हर करण्यासाठी योग्य प्रस्ताव मिळाला नाही तर सरकारने जेटचे अधिग्रहण करावे किंवा एअर इंडियामध्ये जेटचे विलीनीकरण करावे, असा सल्ला बँकांनी द्यावा.


जेट एअरवेजमधून नसीम झैदी यांचा राजीनामा
जेट एअरवेजने मंगळवारी सांगितले की, कंपनीचे अ-कार्यकारी अधिकारी आणि स्वतंत्र संचालक नसीम झैदी यांनी संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी खासगी कामाचा तसेच वेळेची कमतरता असल्याचा हवाला दिला आहे. माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि माजी सिव्हिल एव्हिएशन सचिव झैदी मागील वर्षी आॅगस्टमध्ये जेटच्या संचालक मंडळात सहभागी झाले हाेते.

X