आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेट एअरवेजची 14 उड्डाने रद्द: दोन महिन्यांपासून पगार झालाच नाही; वैमानिकांसह अभियंते मेडिकल रजेवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जेट एअरवेजने रविवारी आपल्या वेगवेगळ्या रुटवरील 14 विमानांची उड्डाने रद्द करत असल्याचे जाहीर केले. सुत्रांच्या माहितीनुसार, वैमानिकांना त्यांचा पगार मिळालेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ते यासंदर्भात कंपनीकडे मागणी करत होते. परंतु, व्यवस्थापन यात अपयशी ठरत असल्याने आता वैमानिकांनी आपल्या आरोग्याचे कारण दाखवत सुट्टी घेतली आहे. घाट्यात चालणाऱ्या जेट एयरवेज व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये ऑगस्ट महिन्यापासून हा वाद सुरू आहे.

 

दोन महिन्यांचा पगार नाहीच...
एअरलाइंसने आपल्या स्टाफला सप्टेंबर महिन्याचा पगार दिला. परंतु, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पगार अद्याप झालेला नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, याच कारणामुळे कर्मचारी मुद्दाम आरोग्याचे कारण देऊन सुट्टीवर गेले आहेत. त्याचा फटका एअरलाइन्सला बसला असून 14 उड्डाने रद्द करावी लागली. गेल्या ऑगस्टपासून व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरू आहेत. व्यवस्थापनाने कंपनी तोट्यात असल्याचे कारणे देऊन कर्मचाऱ्यांचे पगार लांबवले. त्यावर रोष व्यक्त करताना कर्मचाऱ्यांनी निदर्शने सुद्धा केली. तरीही तोडगा निघत नसल्याने आता कर्मचाऱ्यांनी संपाची ही नवीन पद्धत अवलंबली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...