आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेट कॅप्सूल या इटालियन कंपनीची सुपर याट; किंमत तब्बल एक कोटी 85 लाख रुपये 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिलान- जेट कॅप्सूल या इटालियन कंपनीने एक स्टायलिश छोटा याट तयार केला आहे. यात चालकासह १२ लोक बसू शकतात. जहाज तयार करणाऱ्या या कंपनीचे मालक पियारपोले लाझारिनी यांनी सांगितले, या याटची डिझाइन अंतराळ यानापासून घेतली आहे. या लोकांचे लक्झरी लाइफ लक्षात घेऊन तयार केले आहे. हे याट २६ फूट लांब व १२ फूट रुंद आहे. हे संपूर्णत: वातानुकूलित आहे. यात एक बाथरूम, किचन, डायनिंग टेबल व बारसुद्धा आहे. तसेच लोकांना झोपण्याची व्यवस्थाही आहे. ही बुलेटप्रूफही आहे. यात बसलेल्या लोकांना सनडॅकचा आनंद घेता येतो. लाझारनी यांनी सांगितले, हे याट ज्यांना वेगाने जाण्याचे आवडते, त्यांच्यासाठीच खूप चांगले आहे. याचा वेग ताशी ११४ किमी आहे. 

 

६ महिन्यांत बाजारात येईल 
- पियारपोले लाझारिनी यांनी सांगितले, या छोट्या याटीची किंमत दोन लाख पाउंड (सुमारे १ कोटी ८५ लाख रुपये) इतकी आहे. याची चाचणी सुरू आहे. येत्या सहा महिन्यांत ती विक्रीसाठी बाजारात येईल. 
- लक्झरी सुपर याट पूर्णत: बुलेटप्रूफ आहे. 
- पार्टीनुसार लायटिंगचीही सोय करण्यात येते. 

 

बातम्या आणखी आहेत...