Home | National | Other State | Jet crisis: Banks meet no word on funding yet board to meet Tuesday

जेट एअरवेजला 400 कोटींची इमरजेंसी फंडिंग मिळाली नाही, आज रात्रीपासून सर्व उड्डाणे होऊ शकतात बंद?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 07:29 PM IST

पैसे न मिळाल्यामुळे बोर्डसमोर सर्व उड्डाणे रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला

  • Jet crisis:  Banks meet no word on funding yet board to meet Tuesday

    मुंबई - कर्जात बुडालेल्या जेट एअरवेजला बँकांकडून आपत्कालीन फंडिंग मिळाली नाही. जेटने या संकटातून वाचण्यासाठी आणि जेट सुरू ठेवण्यासाठी 400 कोटींची मदत मागितली होती. पण ती मदत मिळाली नाही. आज रात्रीपासून जेटची सर्व उड्डाणे रद्द होतील अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.


    मंगळवारी जेटचे फक्त पाच विमानांनी उड्डाण केले होते. सकाळी जेटच्या बोर्डाची तीन तास बैठक झाली. बँकांकडून मदत न मिळाल्यामुळे मॅनेजमेंटने बोर्डासमोर काही दिवसांसीठी ऑपरेशन पूर्णपणे बंद ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सुत्रांच्या मते बोर्डाने बोर्डाने जेटचे सीईओ विनय दुबे यांच्यावर अंतिम निर्णय सोपवला होता. दुबेंनी एसबीआयकडे तत्काळ 400 कोटी रूपये देण्याचा आग्रह केला होता. जेटला कर्ज देणाऱ्या पीएनबी बँकेचे एमडी आणि सीईओ सुनिल मेहता यांनी सांगितले की, सध्यातरी जेटला पैसे देण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाऊ शकत नाही.


Trending