आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेटला काही विमाने परत द्यावी लागणार; कंपनीने डिसेंबरमध्ये विमानाचे भाडे भरलेले नाही 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कर्जाच्या संकटात अडकलेल्या जेट एअरवेजसमोरील अडचणी आणखी वाढत आहेत. कंपनी विमानाचे भाडे भरू शकलेली नाही. कंपनीला हे भाडे ३१ डिसेंबरपर्यंत द्यायचे होते. त्यामुळे विमाने भाड्याने देणाऱ्या कंपन्या काही विमाने परत घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या मंगळवारीच लीजिंग कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत एसबीआय मुख्यालयात जेटच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही. जेटला कर्ज देणारी मुख्य बँक एसबीआयनेही लीजिंग कंपन्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लीजिंग कंपन्या वकिलांशी चर्चा करत आहेत. जीई कॅपिटल एव्हिएशन सर्व्हिसेस, एसएमबीसी एव्हिएशन कॅपिटल आणि जॅक्सन स्क्वेअरसारख्या विमान लीजिंग कंपन्या जेटला नवीन बोइंग विमान ७३७ मॅक्सची डिलिव्हरी थांबवण्याचा विचार करत आहेत. यादरम्यान जेटने शुक्रवारी सांगितले की, आम्ही अडचणी दूर करण्याच्या आराखड्यावर काम करत आहोत. या संदर्भात भागीदारांना ही सतत माहिती देण्यात येत आहे. जेट एअरमध्ये अबुधाबीच्या एतिहाद एअरवेजची २४ टक्के भागीदारी आहे. जेटला एतिहादकडून आर्थिक मदत हवी आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीचा तोटा पाहता तत्काळ गुंतवणूक करण्याची एतिहादला इच्छा नाही. कंपनीचे प्रमुख नरेश गोयल यांची टाटा समूहासोबत चर्चा झाली होती. गोयल यांनी पद सोडावे अशी टाटा समूहाची मागणी असल्याने ही चर्चा पूर्ण झाली नाही. मुंबई शेअर बाजारात आकडेवारीनुसार जून आणि सप्टेंबर तिमाहीमध्ये जेटला २,६२० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...