आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगावातील बाप्पाच्या अंगावर ७० लाखांचे दागिने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- येथील दालफैल भागातील राणा नवयुवक मंडळाच्या बाप्पाची विदर्भातील सर्वात श्रीमंत गणेश म्हणुन ख्याती आहे. खामगावचा राजा म्हणुन हा गणपती शहरात व परिसरात ओळखल्या जातो. या श्री गणेशाच्या अंगावर ७० लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आहेत. 


लोकमान्य टिळकांच्या प्रबोधनाचा वारसा येथील हिंदुसुर्य राणा नवयुवक दलाच्या वतीने जोपासल्या जात आहे. शहरात सर्व प्रथम आरोग्य व क्रीडा विषयक सेवा देण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला. गेल्या २२ वर्षापासून राणा मंडळाने यावर सोन्या चांदीचे दागिने चढविले आहे. आजपर्यंत गणरायाच्या मुर्तीवर ७० लाखाचे दागीने आहे. त्यामुळे विदर्भातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणुन त्यांची ओळख आहे. या मुर्तीचे विसर्जन केले जात नाही. 
या मंडळाकडून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सवा सोबतच संकष्ट चतुर्थी व इतर धार्मिक उपक्रम राबविण्याची परंपरा आहे. मुलींचे ढोलपथक व लेझीम पथक विसर्जन मिरवणुकीत सहभागी असते. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळाने देखावा व रथ तयार केला आहे. 


हा रथ केवळ वर्षातुन एकदाच बाहेर काढण्यात येतो विसर्जन मिरवणुकीत या मंडळाचा चवथा क्रमांक असतो. मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे अायाेजन करण्यात येत असते. 

बातम्या आणखी आहेत...