आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- सोलापूर ते जत या एसटी बसने प्रवास करताना महानंदा हिरेमठ (रा. मित्रनगर शेळगी) यांच्या पर्समधून सात तोळे दागिने चोरीस गेले. ही घटना १४ आॅगस्ट रोजी घडली. फौजदार चावडी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे . सौ. महानंदा व त्यांचे नातेवाईक जतला जाण्यासाठी बसमध्ये बसले. पर्समध्ये सोन्याचे दागिने, दोन हजार असे साहित्य ठेवले होते. चोराने पैसे व दागिने पळवले. त्याची किंमत चालू बाजार भावाप्रमाणे दोन लाख होते. मात्र पोलिसात ७२ हजारांची नोंद आहे.
मजरेवाडी चौकात मंगळसूत्र हिसकावले
मजरेवाडी चौकातून पायी जाताना महिलेच्या गळ्यातील चार तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या तरुणांनी पळवले. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. पौर्णिमा अण्णापा चाबुस्कवार (जयबजरंग नगर, होटगी रोड) यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. सौ. पोर्णिमा या काही महिलांसोबत मजरेवाडी प्राथमिक शाळा ते गिरी मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरून पायी जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र गंठण हिसकावले. चार तोळे दागिन्यांची किंमत चालू बाजार भावाप्रमाणे एक लाख वीस हजार रुपये होते. पोलिसांनी मात्र ९२ हजारांची नोंद घेतली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.