आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
झाबुआ - भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीला झाबुआच्या कडकनाथ रिसर्च सेंटर (कृषी विज्ञान केंद्र) ने कडकनाथ चिकन खाण्याचा सल्ला दिला आहे. सेंटरने याबाबत कोहलीला एक पत्रही लिहिले आहे. पत्राची कॉपी ट्विटरवर पोस्ट केली आहे. सेंटरचे संचालक आयएस तोमरने फॅट आणि कोलेस्ट्रॉल जास्त असल्याच्या भितीपोटी कोहलीने ग्रिल्ड चिकन सोडल्याचा मीडिया रिपोर्ट वाचून हे पत्र लिहिले आहे.
तोमर म्हणाले की, फॅट आणि कोलेस्ट्रॉलमुळे जर कोहली आणि टीम इंडियाचे क्रिकेटपटू ग्रिल्ड चिकन खाणे सोडून वेगन (शाकाहारी) डाएट घेत असतील तर ते बिनधास्तपणे झाबुआचे कडकनाथ चिकन खाऊ शकतात. यात नगण्य प्रमाणात फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल असते. यात आयरन आणि ल्युरिक अॅसिड पुरेशा प्रमाणात असते. तोमर यांनी पत्राबरोबर हैदराबादच्या नॅशनल मीट रिसर्च संस्थेचा अहवालही सोबत जोडला आहे. त्यात सर्वसाधारण चिकन आणि कडकनाथ चिकन यातील फरक दर्शवलेला आहे.
सहा महिन्याच्या वादानंतर झाबुला मिळाला होता कडकनाथचा कॉपीराईट
कडकनाथ कोंबडीसाठी झाबुआला सहा महिन्यांच्या वादानंतर जीआय टॅग मिळाला होता. झाबुआमध्ये कृषी विज्ञान केंद्राबरोबर काम करणाऱ्या ग्रामी विकास ट्रस्ट (जीव्हीटी) ने 2012 मध्ये कडकनाथवर जीआय टॅगसाठी अप्लाय केले होते. नंतर दंतेवाडा कलेक्टरने जीआय टॅगसाठी अप्लाय केले होते. त्यावर झाबुआ कलेक्टर आशीष सक्सेना यांनी पशुपालन विभागाला पत्र लिहून 2012 मध्ये केलेल्या अर्जाबाबत माहिती दिली. त्यानंतर छत्तीसगडने क्लेम मागे घेतला आणि कडकनाथ झाबुआला मिळाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.