आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jhanvi Kapoor Birthday Brother Arjun, Sister Anshula And Father Boney Kapoor Shared Their Feelings

जान्हवीला शुभेच्छा देताना अर्जुन म्हणाला- आईच्या निधनानंतर मला त्यांच्या आयुष्यात जाणे गरजेचे होते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. जाह्नवी कपूर 23 वर्षांची झाली आहे. यानिमित्ताने तिचा मोठा भाऊ अर्जुन, बहीण अंशुल आणि वडील बोनी कपूर यांनी तिच्याविषयीच्या भावना दिव्य मराठीकडे व्यक्त केल्या. अर्जुन म्हणतो - लहान वयातच आई गमावल्याचा धक्का जान्हवी आणि खुशीला सहन करावा लागला, त्यांच्यासाठी ते खूप धक्कादायक होते.  मी स्वत: या दु: खातून गेलोय, त्यामुळे मी त्यांचे दुःख समजू शकतो. त्यावेळी जान्हवी आणि खुशी ज्या परिस्थितीत होत्या, त्यावेळी मला आणि अंशुलाला त्यांच्या आयुष्यात येण्याची गरज होती.

एक सेकंदासाठी त्या परिस्थितीचा विचार. जर त्यांची आई त्यांच्यासोबत असती तर आम्ही अशा परिस्थितीत त्यांच्या आयुष्यापासून दूर राहिलो असतो. पण त्यावेळी त्यांना प्रेम आणि आपुलकीची गरज होती. आम्ही हे सत्य नाकारू शकत नाही. प्रेम वाटणे ही वाईट गोष्ट नाही. त्या दुःखद घटनेपुर्वी आम्हाला  त्यांच्या आयुष्यात जाण्याची गरज नव्हती. त्यांनाही आमच्या आयुष्यात येण्याची गरज नव्हती. अचानक त्यांच्या आईच्या निधनानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की आमचे एक जग बनले.

चांगली गोष्ट अशी आहे की, त्यावेळी आम्ही सर्वजण एकमेकांसोबत होतो आणि आजही आहोत. मी माझ्या कुटुंबासाठी वेळ काढतो. जे लोक कुटूंबावर हल्ला करतात त्यांना मी सोडत नाही, म्हणून मी जान्हवीच्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतो.
जान्हवीच्या चित्रपटसृष्टीतील क्रिटिक्सना पुन्हा घराणेशाहीवर बोलण्याची संधी मिळाली. चित्रपटांमध्येच घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केले जातात. उर्वरित क्षेत्रात, जर मुलांनी आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पदवी घेतल्यास आणि आपल्या कुटुंबाचा किंवा पालकांचा वारसा पुढे नेल्यास घराणेशाहीवर कोणतीही चर्चा होत नाही. तेथे ही एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. आमच्या क्षेत्रात असे झाल्यास, गोंधळ उडतो. हा शो बिझ असल्यामुळे कदाचित असे असावे. प्रत्येकजण आपल्यावर लक्ष ठेवतो.

  • आमची बाँडिंग सामान्य बहिणींसारखी आहे: अंशुला

यावेळी अंशुला म्हणाली, माझी लहान बहीण जान्हवीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तिचे माझे आणि खुशी (धाकटी बहीण) चे बाँडिंग अगदी सामान्य बहिणीसारखेच आहे. जर आम्ही तिघीही एखादी पार्टी साजरा करायला गेलो तर अगदी सामान्यपण बहिणींमध्ये जे घडते तेच आमच्यातही घडते, म्हणजेच थोडीशी तू तू मैं मैं आणि भरपूर खाणे. आमच्या संपूर्ण कुटुंबाला खाण्याची आवड आहे. कारण आम्ही पंजाबी आहोत. जान्हवीसुद्धा आमच्यासारखी फूडी आहे. आमच्या घरी, आजीच्या घरी, अनिल चाचूच्या घरी स्पेशल जेवण मिळते. आमच्या घरातील जेवणाचे टेबल आमच्यासाठी फनी पॉइंट असतो. जेव्हा आम्ही बाहेर जातो, तेव्हा आम्ही देश-विदेशातील अपडेट्स, करिअर अपडेट्स, लाईफ अपडेट्सवर बोलतो. वीकेण्डला जर चित्रपट बघायला गेलो तर त्याबद्दल चर्चा करा. मला खुशी-जान्हवीचे पेट्स खूप आवडतात. जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा आम्ही एकमेकांना आपल्या डॉग्सची छायाचित्रे दाखवतो. पेट्सच्या केअरवर चर्चा करतो. जर इंस्टाग्रामवर काही खास बघितले तर त्याबद्दल बोलतो. एखादी बॅग, लिपस्टिक किंवा आवडता ड्रेस  आवडला तर त्याविषयी चर्चा करतो. जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा अशा हलक्याफुलक्या गप्पा मारतो. 

  • माझ्या मुलींना माझे आशीर्वाद आहेत आणि नेहमीच राहतील: बोनी कपूर

बोनी कपूर म्हणाले, माझ्या मुलींना माझे आशीर्वाद सदैव आहेत आणि कायमच राहतील. सध्या मी चेन्नईमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहे, परंतु तिच्या वाढदिवशी मुंबईत येणार आहे. बर्थडे सेलिब्रेशनसाठी आम्ही चारजण अर्जुन, अंशुला आणि जान्हवी एका टेबलावर बसून जेवतो. खुशी न्यूयॉर्कमध्ये आहे, अन्यथा ती  पण सोबत असती. मी अलीकडेच जान्हवीचा  'गुंजन सक्सेना' हा चित्रपट पाहिला आणि माझे मन आनंदाने भरुन गेले.  

टीपः अर्जुनसोबत अमित कर्ण यांनी चर्चा केली, ज्योती शर्मा यांनी अंशुलाबरोबर तर उमेश उपाध्याय यांनी बोनी कपूर यांच्याशी चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...