आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंड : 70 तासांचे लक्ष्य हाेते, रेल्वे अभियंत्यांनी 6 तासांत बनवला सब-वे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - झारखंडमध्ये रांची रेल्वे विभागाच्या अभियंत्यांनी ७० तासांचे काम अवघ्या ६ तासांत पूर्ण करून दाखवले. अभियंत्यांनी रेल्वे क्राॅसिंग गेट बंद करण्यासाठी साधारण उंचीचा सबवे केवळ ६ तासांत बनवला. यामुळे रेल्वेचे माेठे नुकसान हाेण्यापासून वाचले तसेच प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करावा लागला नाही. प्रवाशांनाही कमी त्रास झाला. हे शक्य झाले ते दक्षिण पूर्व रेल्वेचे महाव्यवस्थापक पी.एस. मिश्रा यांच्या नव्या प्रयाेगामुळे.


मिश्रा म्हणाले, माझ्या टीमचा मला अभिमान वाटताे. आमची टीम सर्वात चांगली आहे. सबवे झाल्याने १० हजार गावकऱ्यांना फायदा हाेईल. सब-वे  बनवण्याचे काम रविवारी सकाळी ९.४५ वाजता सुरू हाेऊन  दुपारी ३.४५ वाजता संपले.

बातम्या आणखी आहेत...