आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jharkhand Education Minister Jagarnath Mahto Stunned When Students Told Him Amit Shah Is Chief Minister And Hemant Soren Is Education Minister

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळेच्या दौऱ्यावर असलेल्या शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव विचारले; उत्तर मिळाले- अमित शाह

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिक्षण मंत्री जगरनाथ महतो यांनी शिक्षण मंत्र्यांचे नाव विचारल्यावर उत्तर आले- हेमंत सोरेन

रामगड- झारखंडचे शिक्षण मंत्री जगरनाथ महतो यांच्या रामगडमधील एका सरकारी शाळेच्या दौऱ्यावर असताना एक चकीत करणारा किस्सा घडला. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या सोप्या प्रश्नांची उलट उत्तरे दिली. या घटनेनंतर शाळा प्रशासनावर चौकशी नेमण्यात आली आहे.


महतो गुरुवारी रामगडच्या कोइया गाववातील सरकारी शाळेत पोहचले. शाळेतील सातवीत शिकाणाऱ्या विद्यार्थ्यांना मंत्री महोदयांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचे नाव विचारल्यावर उत्तर आले हेमंत सोरेन. इतकच नाही तर महतो यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव विचारल्यावर अमित शाह यांचे नाव घेतले. या घटनेची सध्या खूप चर्चा होत आहे.

शाळेच्या मुख्याध्यापीका कलावती सोनी यांनी सांगितले की, विद्यमान शिक्षण मंत्र्यांनी 10 दिवसांपूर्वीच पदभार स्विकारला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही. शिक्षण मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान शाळेत 90 विद्यार्थी आणि 4 शिक्षक होते. 

रामगडचे डेप्यूटी कमिश्नर संदीप सिंह यांनी सांगितले की, खराब शिक्षण व्यवस्थेसाठी शाळेवर चौकशी नेमण्यात आली आहे. रामगडचे डिस्ट्रीक्ट सुपरिटेंडेंट ऑफ एजुकेशन सुशील कुमार या घटनेची चौकशी करतील आणि लवकरच प्रशासनाला आपला अहवाल सादर करतील. दुसरीकडे महतो म्हणाले की, या घटनेनंतर इतरही शाळांची अशीच तपासणी केली जाईल.