आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Jharkhand Elecion Results Live | Jharkhand Assembly Vidhan Sabha Elecion Result 2019 Today News Updates

झामुमो-काँग्रेस आघाडीला बहुमत; भाजपचे रघुवर-लक्ष्मण दोघेही पराभूत, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे दिला राजीनामा

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
मुख्यमंत्री रघुबर दास यांनी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला राजीनामा - Divya Marathi
मुख्यमंत्री रघुबर दास यांनी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला राजीनामा
 • विद्यमान मुख्यमंत्री रघुवर दास जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून तर प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुआ चक्रधरपूर येथून पराभूत
 • झामुमो-काँग्रेस आघाडीचे 46 उमेदवार पुढे, बहुमतापेक्षा 5 जागा जास्त, भाजपची 25 तर आजसूची 2 जागांवर आघाडी

रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीत झामुमो-काँग्रेस आघाडीला बहुमत मिळत आहे. निकाल समोर येताच आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हेमंत सोरेन यांनी वडील शिबू सोरेन यांची भेट घेत आशिर्वाद घेतला. यानंतर हेमंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, झारखंडच्या जनतेसाठी आज उत्साहाचा दिवस आहे. आजचा दिवस माझ्यासाठी संकल्प करण्याचा दिवस आहे. राज्यातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याबाबत संकल्प करण्याचा दिवस आहे. आजचा हा जनादेश शिबू सोरेन यांच्या परिश्रम आणि समर्पणाचा परिणाम आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेमंत सोरेन यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपला राज्याची अनेक वर्षे सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी झारखंडच्या जनतेचे आभार मानले. 
 

हेमंत बेरहट आणि दुमका दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे विद्यमान मुख्यमंत्री रघुवर दास स्वतःचे माजी सहयोगी सरयू राय यांच्याकडून 10,000 हून अधिक मतांनी पराभूत झाले. रघुवीर यांच्या व्यतिरिक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांना सुद्धा चक्रधरपूर येथून पराभव स्वीकारावा लागला. मात्र झामुमोच्या सीता मुर्मू जामा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. एक्झिट पोलचे निकाल ठरले योग्य

81 मतदारसंघ असलेल्या विधानसभेच्या बहुमतासाठी 41 चा आकडा आवश्यक आहे आणि महाआघाडीला 46 जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तर भाजप 25 जागांवर पुढे आहे. झारखंड विधानसभेसाठी 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत 5 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. यात एकूण 65.23% मतदान झाले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात 66.6% मतदान झाले होते. मतदानाचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर पाच एक्झिट पोल समोर आले. यामध्ये काँग्रेस-झामुमो-राजद महाआघाडीला बहुमत मिळणार असल्याचे सांगितले होते. आज माझ्यासाठी संकल्प करण्याचा दिवस - हेमंत सोरेन

दरम्यान सोरेन म्हणाले की, झारखंडच्या जनतेसाठी आज उत्साहाचा दिवस आहे. आजचा दिवस माझ्यासाठी संकल्प करण्याचा दिवस आहे. राज्यातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याबाबत संकल्प करण्याचा दिवस आहे. आजचा हा जनादेश शिबू सोरेन यांच्या परिश्रम आणि समर्पणाचा परिणाम आहे.

अपडेट्स...

 • मुख्यमंत्री रघुवर दास यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केला राजीनामा.
 • 04:05 PM 47 जागांवर आघाडीसह काँग्रेस+ ची बहुमताच्या दिशेने वाटचाल, भाजपचे 23 उमेदवार आघाडीवर
 • 01:20 PM भास्करशी बातचीत करताना हेमंत सोरेन म्हणाले- नोटबंदी, एनआरसी आणि सीएए करून नागरिकांना रांगेत उभे करणाऱ्या भाजपला सत्तेतून बाहेर केले
 • 12:00 PM काँग्रेस+ 42 आणि भाजप 28 जागांवर पुढे
 • 11:52 AM काँग्रेस+ 40 आणि भाजप 29 जागांवर पुढे
 • 11:39 AM काँग्रेस+ 39 आणि भाजप 30 जागांवर पुढे
 • 11:15 AM भाजपा 29, काँग्रेस+ 41 जागांवर पुढे
 • 11:00 AM भाजप 28, काँग्रेस+ 42 जागांवर पुढे
 • 11:00 AM भाजप 28, काँग्रेस+ 42 जागांवर पुढे
 • 10:32 AM भाजप 30, काँग्रेस+ 34 जागांवर पुढे
 • 10:32 AM भाजप 31, काँग्रेस+ 38 जागांवर पुढे
 • 10:29 AM भाजप 33, काँग्रेस+ 37 जागांवर पुढे
 • 10:23 AM भाजप 30, काँग्रेस+ 39 जागांवर पुढे
 • 10:18 AM भाजप 30, काँग्रेस+ 40 जागांवर पुढे
 • 10:09 AM भाजप 29, काँग्रेस+ 41 जागांवर पुढे
 • 9:58 AM भाजप 29, काँग्रेस+ 41 जागांवर पुढे
 • 9:37 AM भाजप 31, काँग्रेस+ 39 जागांवर पुढे
 • भाजप 30 आणि काँग्रेस+ ची 39 जागांवर आघाडी
 • हेमंत सोरेन बरहेट येथून आघाडीवर, तर दुमका येथून पिछाडी
 • कांके येथून भारतीय जनता पक्षाचे समरीलाल आघाडीवर
 • लोहरदगा येथून भाजपचे सुखदेव भगत पिछाडीवर
 • काँग्रेस+ 40, भाजपची 31 जागांवर आघाडी

निवडणुकीवर दोन मोठया निर्णयाचा परिणाम

राम मंदिर - 9 नोव्हेंबरला आलेला राम मंदीराचा निर्णय आणि 12 डिसेंबरला घेण्यात आलेल्या नागरिकत्व संशोधन कायद्याच्या निर्णयानंतर ही पहिलीच निवडणुक होत आहे. त्यामुळे ही निवडणुक म्हणजे भाजपसाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारसभेदरम्यान राम मंदीराचा मुद्दा जोर लावून धरला होता. एका सभेदरम्यान अमित शाह यांनी दावा केला होता की, येत्या चार महिन्यात राम मंदीराचे निर्माण केले जाईल.

नागरिकत्व कायदा वाद- मोदी सरकारने 9 डिसेंबरला सुधारित नागरिकत्व विधेयक लोकसभेत सादर केले होते. त्यानंतर झारखंडमध्ये 12, 16 आणि 20 डिसेंबरला मतदान पार पडले.

बातम्या आणखी आहेत...