भाजप मोदींची लाट असल्याचे बोलत आहेत. यात थोडेफार तथ्य आहे, मात्र त्याला स्फोटक स्वरूप मिळणार नाही. भाजपला 14 पैकी 14 की 14 पैकी 12 जागा मिळतील असे समजणे हा भ्रम आहे. मात्र, सद्य:स्थितीत भाजपच्या सातपैकी दोन किंवा तीन जागा वाढल्यास आश्चर्य वाटणार नाही. कॉँग्रेसकडे एक जागा आहे. एक-दोन जागा वाढवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रादेशिक पक्ष आजसू, जेव्हीएम आणि जेएमएमही जोर दाखवतील. मात्र, त्यांच्या पारड्यात किती जागा पडतील हे सांगणे कठिण आहे. याचे कारण म्हणजे, दुमका, हजारीबाग, चतरा, पलामू आणि रांचीमध्ये समिकरणे बिघडली आहेत.
झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 10 एप्रिल रोजी आहे. चार जागांवर या दिवशी मतदान आहे. लोहरगा, चतरा, पलामू आणि कोडरमा. चारही जागा नक्षलप्रभावीत आहेत. नक्षल्यांची निवडणुकीवर छाप आहे. काही ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन तर काही उमेदवारांना त्यांचा पाठिंबा आहे. नेते ते मानणार नाहीत मात्र लोक त्याबाबत उघडपणे तर पोलिस दबक्या आवाजात बोलतात. उमेदवार जातीय समीकरणाच्या जोरावर जिंकण्याच्या तयारीत आहेत. शाही इमाम यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष झाले तरी इथे जातीला महत्त्व आहेच असे त्यांना वाटते. जातीय समिकरण पक्के केल्यास नेत्यांचा विजय ठरलेला आहे. दहा जागांवर 17 आणि 24 एप्रिल रोजी मतदान होईल. अनेक मोठ्या नेत्यांच्या राज्यभर सभा झाल्या आहेत. मोदी यांच्या दोन फेर्या झाल्या.
सोनिया गांधी यांची एक सभा झाली. राहुल यांचाही दौरा झाला. लालुप्रसाद यादव, जयराम रमेश, ममता बॅनर्जी, मिथून चक्रवर्ती, अखिलेश यादव यांच्या सभा झाल्या आहेत. स्थानिक स्टार प्रचारकांमध्ये माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, बाबूलाल मरांडी, सुदेश मेहतो सक्रिय आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन आधी संथाल आणि जमशेदपूरमध्ये सक्रिय होते आता त्यांचे राज्यभर दौरे होत आहेत. दरम्यान, शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांच्या कॉँगे्रस, राजद आणि तृणमूल कॉँग्रेसला पाठिंबा देण्याच्या वक्तव्याची चर्चा होत आहे. झारखंडमध्ये मुस्लिम सर्वाधिक अल्पसंख्याक समाज आहे. असे असतानादेखील इमामांच्या आवाहनाचा येथील मुस्लिमांत लवलेश दिसत नाही.
० लेखक झारखंडचे संपादक आहेत.