आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jharkhand Election Result | Divya Marathi Analysis Of BJP Defeat In Jharkhand, Five Reasons Why Bharatiya Janata Party Lost Plot In Jharkhand Vidhan Sabha Election 2019

ही आहेत झारखंडमध्ये भाजपच्या पराभवाची 5 कारणे: लोकसभा निवडणुकीनंतर असा घटला व्होट शेअर

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • भाजपला इतर पक्षातून आलेल्यांना तिकीट देणे पडले महागात
  • दलित-आदिवासी-मागास मतदार सुद्धा भाजप पासून दुरावला

शशि भूषण

रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीत ऑल झारखंड स्टुडेंट्स युनियन पार्टी अर्थात आजसू सत्ताधारी पक्षातून बाहेर पडल्याचा मोठा फटका भाजपला बसला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष झामुमो, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दला महाआघाडी करत एकत्रित येत आहे. या पक्षांनी वेळीच जागा वाटप केल्या होत्या. भाजपसारखा आक्रमक प्रचार न करता दुरस्थ भागांमध्ये जाऊन प्रचार मोहिम राबवली तसेच आपल्या मित्र पक्षांना सोबत घेतले. याचाच काँग्रेस+ महाआघाडीला मोठा फायदा झाल्याचे दिसून येत आहे.

1. भाजपचा व्होट शेअर 51% होता आता 33% टक्क्यांवर

मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले त्यावेळी भाजपकडे मतदारांचा 51 टक्के आकडा होता. या व्होट शेअरच्या बळावर भाजपने 54 विधानसभा मतदार संघांमध्ये पकड मजबूत केली होती. 35 विधानसभा जागांमध्ये भाजपची आघाडी 50 हजारांहून अधिक होती. यातील 16 विधानसभा जागांवर आघाडीचा फरक 90 हजारांपेक्षा जास्त होता. भाजपने राज्यातील 14 पैकी 11 लोकसभा जागा मिळवल्या होत्या. आजसूला यातील एक जागा मिळाली होती. त्यामुळेच, विधानसभा निवडणुकीत भाजपला परत सत्तेवर येण्याची अपेक्षा होती. विधानसभा निवडणुकीत भाजपचा व्होट शेअर 10% पडला. तरीही 41% मतदारांच्या बळावर भाजपला सत्ता स्थापित करण्यात मदत झाली असती. परंतु, कुर्मी-कोयरीसह अनेक मागासवर्गीय आणि दलितांची साथ असलेले आजसू पक्ष भाजपपासून वेगळे झाले. अशात भाजपचा व्होट शेअर आणखी 8 टक्क्यांनी घसरला आहे मतदारांचा आकडा 33% वर आला.

2. रघुवर दास यांनाही प्रतिष्ठा वाचवता आली नाही

राज्यात मागासवर्ग बहुल 26 विधानसभा मतदार संघांमध्ये भाजपने सत्ता स्थापित केली होती. परंतु, आता याच भागांमध्ये पक्षाला सर्वात मोठे नुकसान झाले आहे. जमशेदपूर पूर्वमध्ये बेकायदेशीर 86 वसत्या कायदेशीर करण्याचा प्रश्न इतका तापला की मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या पायाखालची जणु जमीनच सरकली. आश्वासने देऊन सुद्धा ते या वस्तीच्या लोकांना न्याय देऊ शकले नाही. त्यामुळेच, भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष लढणारे सरयू राय त्यांना वरचढ ठरले.

3. भाजप सरकारवर आदिवासी समुदाय नाराज

जल-जंगल-जमीन या मुद्द्यावर आदिवासी भाजप सरकारवर नाराज होते. राज्यामध्ये औद्योगिक प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात जमीनी सरकारी ताब्यात घेण्यात आल्या. याच जमीनींना आदिवासी कित्येक दशकांपासून आपल्या जमीनी मानत होते. छोटा नागपूर टेनेंसी अॅक्ट आणि संथाल परगणा टेनेंसी अॅक्टमध्ये सरकारने दुरुस्तीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. आपल्या जमिनी उद्योगासाठी वापल्या जातील असा आदिवासींना समज होता. मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर कायद्यात सुधारणा झाली नाही. तरीही आदिवासी सरकारवर नाराज झाले. अनुसूचित जमातींसाठी सुरक्षित 28 जागांमध्ये 20 झामुमो-काँग्रेसला मिळाल्या आहेत. भाजपला या ठिकाणी 5 जागांचे नुकसान झाले.

4. महाआघाडीची तयारी आधीच, निवडणूक जाहीर होताच भाजपतून आजसू बाहेर

झामुमो-काँग्रेस-राजद आघाडीची घोषणा आधीच करून जागा वाटप झाले आणि निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली. तर भाजप-आजसू युती निवडणुकीच्या घोषणेनंतर तुटली. आजसू गेली पाच वर्षे भाजपसोबत सत्तेवर होते. जागा वाटपावर झालेल्या वादानंतर आजसूने वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नव्हे, तर भाजपने आपलेच माजी मंत्री सरयू राय यांना तिकीट नकारले आणि चक्क दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना तिकिटे देण्यात आली.

5. महाआघाडीने प्रचाराचा गनिमी कावा वापरला, मोठ्या सभा टाळल्या

भाजपच्या मोठ्या नेते मंडळींनी कारपेट बॉम्बिंग स्टाइलमध्ये प्रचार केला. तर आघाडीच्या नेत्यांनी त्या उलट प्रचाराचा गनिमी कावा वापरला. मोठ्या सभा घेतल्या नाहीत. त्यापेक्षा दुरस्थ अशा भागांमध्ये हेलिकॉप्टर उतरवले आणि वेग-वेगळ्या प्रचार सभा घेऊन अगदी तळा-गळाच्या समुदायांशी संवाद साधला. ज्या ठिकाणी स्थानिक नेत्यांची साथ मिळाली तेथे त्या नेत्यांना सोबत घेऊन सभा घेतल्या. हीच व्यूहरचना यशस्वी ठरली.
 

बातम्या आणखी आहेत...