आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jharkhand Election Results 2019 Political Reaction On Live Results Marathi News And Updates

प्राथमिक निकाल समोर येत असताना मुख्यमंत्री रघुवर दास म्हणाले- निकाल अंतिम नाहीत, भाजपचीच सत्ता येईल!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर केले जात आहेत. यामध्ये एकूणच 81 जागांपैकी बहुतांश जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. परंतु, हे निकाल अंतिम नाहीत आणि भाजपच सत्ता स्थापन करेल असा दावा मुख्यमंत्री रघुवर दास यांनी केला आहे. ते मुख्यमंत्री जमशेदपूर पूर्व जागेवरून पिछाडीवर आहेत. त्यांना अपक्ष उमेदवाराने तगडी टक्कर दिलेली आहे. तिकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष सुद्धा साजरा करण्यास सुरुवात केली. त्यावर बोलताना, आनंद कुणीही साजरे करू शकतो. परंतु, मतमोजणीचे अनेक राउंड बाकी आहेत असे रघुवर दास म्हणाले आहेत.


भाजपमध्ये बंड पुकारून अपक्ष लढणारे माजी मंत्री सरयू राय यांनी आपले कार्यकर्ते खुश असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मते, "कोण हसणार आणि कोण रडणार हे परिस्थितीत सांगेल. आज मी कदाचित हसत असेल, उद्या परिस्थिती वेगळी झाल्यास रडण्याची वेळ सुद्धा येऊ शकते." सत्तेच्या समिकरणांवर बोलताना "मी पुन्हा भाजपमध्ये जाणार नाही. माझ्या मागे-पुढे कुणीच नाही. झोट्याशा झोपडीतच मी खुश आहे. भाजपने आधीच परिस्थिती समजली तर परिस्थिती वेगळी झाली असती." असे राय म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...