आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jharkhand Election Results | Jharkhand Vidhan Sabha, Jharkhand Assembly Election 2019 Hot Seat: Raghubar Das (BJP (JVM) Babulal Marandi , (JMM) Hemant Soren

एका ठिकाणी तर प्रतिस्पर्धीच्या हत्येप्रकरणी दुसरा आहे जेलमध्ये, त्यांच्याच पत्न्या आता आमने-सामने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - झारखंडमध्ये जमशेदपूर पूर्व, दुमका, बरहेट, सिल्ली, धनवार आणि झरिया या जागांवर हायप्रोफाइल लढती सुरू आहेत. या जागांवर मुख्यमंत्री रघुवर दास, झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हेमंत सोरेन आणि आजसू प्रमुख सुदेश महतो यांच्यासारखे नेते मैदानात आहेत.

1. जमशेदपूर पूर्व: मंत्री आणि मुख्यमंत्र्यांत लढत

जमशेदपूर पूर्व राज्यातील सर्वात हॉट सीट मानली जात आहे. येथे मुख्यमंत्री रघुवर दास यांना भाजपने उतरवले आहे. ते याच मतदार संघातून 5 वेळा जिंकले आङेत. परंतु, त्यांच्याच कॅबिनेटमध्ये मंत्री राहिलेले सरयू राय यांच्यामुळे यावेळी रघुवर यांचा विजय कठिण वाटतो. भाजपमध्ये बंडखोरी करून राय अपक्ष निवडणूक लढत आहेत. यासोबतच काँग्रेसचे नेते गौरव वल्लभ सुद्धा येथूनच मैदानात आहेत.

2. दुमका: सीएम उमेदवार हेमंत सोरेन यांची प्रतिष्ठा पणाला

दुमका येतून झामुमो (झारखंड मुक्ती मोर्चा)चे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन मैदानात आहेत. महाआघाडीने त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित केले आहे. हेमंत सोरेन यांना भाजपचे माजी मंत्री डॉ. लुइस मरांडी टक्कर देत आहेत. 2014 मध्ये लुइस यांनी सोरेन यांना 5 हजार मतांनी पराभूत केले होते.

3. बरहेट: झामुमोचा गड, हेमंत सोरेन येथूनही उमेदवार

2014 च्या निवडणुकीसारखेच हेमंत सोरेन यांनी दुमकासह बरहेट येथून उमेदवारी मिळवली आहे. या जागेला झामुमोचा गड मानले जाते. गेल्या 30 वर्षांपासून याठिकाणी झामुमोचा ताबा आहे. 2014 मध्ये हेमंत सोरेन येथूनच जिंकले होते. यावेळी त्यांना भाजपचे सिमोन मालतो टक्कर देत आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत कधीच येथून भाजपला यश मिळालेले नाही.

4. सिल्ली: सुदेश महतो यांची प्रतिष्ठेची लढत

सिल्ली जागेवरून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आजसू (ऑल झारखंड स्टुडंट युनियन) प्रमुख सुदेश महतो मैदानात आहेत. झारखंडची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा आजसू भाजपपासून वेगळे होऊन निवडणूक लढत आहे. 2014 मध्ये झामुमोचे अमित कुमार यांनी महतो यांना 29 हजार मतांनी पराभूत केले होते. यानंतर गुन्हेगारी प्रकरणात अमित कुमार यांना शिक्षा झाली आणि ते तुरुंगात गेल्यानंतर पोटनिवडणूक झाली. यानंतर त्यांच्या पत्नी सीमा देवी यांना तिकीट देण्यात आले आणि सुदेश महतो यांचा पुन्हा पराभव झाला.

5. धनवार: माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी

धनवार जागेवरून माजी मुख्यमंत्री आणि झाविमो (झारखंड विकास मोर्चा) सुप्रीमो बाबुलाल मरांडी निवडणूक लढवत आहेत. त्यांची भाजपचे लक्ष्मण प्रसाद सिंह आणि भाकपचे राजकुमार यादव यांच्याशी थेट लढत आहे. 2014 मध्ये भाकप माले च्या तिकीटावर राजकुमार यादव यांनी मरांडी यांना पराभूत केले होते. 2005 मध्ये भाजप तर 2009 मध्ये झारखंड विकास मोर्चाने विजय मिळवला होता.

6. लोहरदगा: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मैदानात

लोहरदगा जागेवरून काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष रामेश्वर उराव यांना मैदानात उतरवले आहे. भाजपने सुखदेव भगत यांना तिकीट दिले. भगत याच राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर आजसूने माजी आमदार कमल किशोर यांच्या पत्नी नीरू शांती यांना तिकीट दिले आहे.

7. झरिया: एकाच कुटुंबातील दोन सुना आमने-सामने

या जागेवरून कोयलांचलच्या राजकीय कुटुंबातील दोन सुना समोरासमोर आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत त्यांचे पती आमने-सामने होते. रागिणी सिंह भाजप आणि पूर्णिमा सिंह काँग्रेसच्या तिकीटांवर निवडणूक लढवत आहेत. 2014 मध्ये या जागेवरून भाजपने संजीव सिंह आणि काँग्रेसने नीरज सिंह यांना तिकीट दिले होते. त्यात नीरज सिंह यांना पराभव पत्करावा लागला होता. 2017 मध्ये नीरज सिंह यांची हत्या झाली. तर संजीव सिंह फिलहाल त्यांच्याच हत्येप्रकरणी तुरुंगात आहेत.