आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाख बेरोजगार युवकांना नोकरी देणार हे राज्य, होईल वर्ल्ड रिकॉर्ड...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास राज्यातील एक लाख बेरोजगार युवकांना खासगी क्षेत्रातीव नोकरीसाठी नियुक्तीपत्र देणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी युवकांना युवा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री रघुवर दास यांनी गुरूवारी ट्वीट करून युवकांसाठी संदेश देताना म्हणाले ‘‘खासगी क्षेत्रासाठी बेरोजगार युवकांना नियुक्तीपत्र दिले जातील. नोकरी मिळणाऱ्या सगळ्या युवकांना शुभेच्छा.’’ त्यांनी अपील केली की, " मन लावून काम करा आणि आपल्या कुटंबीचे आणि आपल्या राज्याचे नाव मोठे करा." 
 

युवकांना दिले जातील नियुक्तिपत्र
मुख्यमंत्री म्हणाले की 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदयांच्या जन्मदिवसवर होणाऱ्या युवा दिवसाच्या कार्यक्रमापूर्वी राज्य सरकार युवा शक्तिला रोजगार देण्याचा मोठा निर्णय घेऊन राज्याला सुधारण्याचे काम करत आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झारखंड विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे आणि आज एक लाख बेरोजगार युवकांना रोजगार देऊन मोटा रेकॉर्ड करणार आहेच. झारखंड सरकारने गुरूवारी एका खासगी कर्यक्रमात एक लाख बेरोजगार युवकांना नियुक्तीपत्र देण्याची घोषणा केली आहे.


या कंपन्यांसोबत केला करार
युवकांना रोजगार देण्यासाठी आयटीई सिंगापूर, एसएफआयव्हीटी, यूके स्किल लिमिटेड, सीसीएल, केम्पी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सिनेडर इलेक्ट्रिक, इंडियन इंस्टीच्यूट ऑफ वेल्डिंग, फेस्टो, हिताची, भारतीय स्किल यूनिवर्सिटी, इस्ट ऑटो तथा सेंचूरियन यूनिवर्सिटीसोबत करार केला आहे. 


स्किल डेव्हलपमेंट सेंटर होतील लॉन्च
समिटमध्ये पाच स्किल डेव्हेलपमेंट सेंटरची ऑनलाइन लॉंचीग होईल. कार्यत्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संदेश वाचून दाखवला जाईल.

बातम्या आणखी आहेत...