आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jharkhand Mob Lynching, Police Claims Tabrez Died Of Cardiac Arrest, Drops Charges Against 11

झारखंडचा तबरेजचा मृत्यू मॉब लिंचिंगने झालाच नाही, त्याचा जीव तर कार्डिअॅक अरेस्टने गेला; 11 जणांविरुद्ध हत्येचा खटला मागे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर - देशभर गाजलेल्या झारखंडच्या तबरेज मॉब लिन्चिंग प्रकरणात एक धक्कादायक पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. येथील पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, तबरेज अंसारीचा मृत्यू हा मॉब लिंचिंगने नाही, तर कार्डिअॅक अरेस्टने झाला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचे कारण समोर आल्यानंतर पुन्हा तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. त्यामध्ये सुद्धा तबरेजचा मृत्यू मॉब लिन्चिंगमध्ये झालेला नाही असे स्पष्ट करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यानंतर पोलिसांनी सर्वच 11 आरोपींच्या विरोधात असलेला हत्येचा खटला मागे घेतला. आता त्या सर्वांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा खटला चालवला जाणार आहे.

गावकऱ्यांचा तबरेजला ठार मारण्याचा हेतू नव्हता -पोलिस
> सरायकेला-खरसावां येथील पोलिस अधीक्षक कार्तिक एस यांनी सांगितल्याप्रमाणे, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे, की हे प्रकरण सुनियोजित हत्येच्या कटाचे नाही. या प्रकरणी सरायकेला पोलिसांनी ऑगस्टमध्ये कलम 304 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते. तत्पूर्वी तबरेजच्या पत्नी आणि कुटुंबियांनी हत्येची तक्रार दाखल केली होती.
> उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी समोर आलेल्या शवविच्छेदन अहवालात कार्डिएक अरेस्टसह डोक्यात गंभीर दुखापत आणि फ्रॅक्चरचा उल्लेख होता. यानंतर एका तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून पुन्हा चौकशी करण्यात आली आमि त्यामध्येही कार्डिएक अरेस्टचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की आम्ही यापूर्वी कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. परंतु, तबरेजचा मृत्यू घटनास्थळी झालेला नाही. सोबतच, तबरेजला ठार मारण्याचा गावकऱ्यांचा हेतू नव्हता आणि मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा मृत्यूचे कारण कार्डिअॅक अरेस्ट सांगण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?
17 जूनच्या रात्री धातकीडीह गावात चोरीच्या आरोपात ग्रामस्थांनी तबरेजला पकडून मारहाण केली होती. रात्रभर झालेल्या या मारहणीचे काही व्हिडिओ सुद्धा समोर आले होते. त्यामध्ये गावकरी तबरेजला मारहाण करताना जय श्री राम म्हण असे सांगताना दिसून आले. 18 जून रोजी पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तबरेज गंभीर जखमी होता. रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी फिट घोषित केले आणि पोलिसांनी त्याला तुरुंगात डांबले. 22 जून रोजी तबरेजची परिस्थिती नाजूक झाली तेव्हा पुन्हा त्याची रवानगी रुग्णालयात करण्यात आली. याच ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. या प्रकरणात अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा सुद्धा दाखवण्यात पोलिसांनी तबरेजला उपचारासाठी नेण्यास विलंब लावला. त्याला उपचाराची गरज असतानाही दुर्लक्ष करून तुरुंगात डांबण्यात आले. झारखंड हायकोर्टात या संदर्भात पंकज कुमार यांनी याचिका दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...