Home | National | Other State | Jharkhand news ramgarh road accident claims life of 10 of same family from ranchi

झारखंडमध्ये भीषण अपघात.. तीन चिमुरड्यांसह 10 जणांचा मृत्यू, व्रतबंधनाचा कार्यक्रम करून परतणार्‍या कुटुंबावर काळाचा घाला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 09, 2019, 03:29 PM IST

कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. तब्बल तीन तासांनी कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.

  • Jharkhand news ramgarh road accident claims life of 10 of same family from ranchi

    रामगढ (झारखंड)- राष्ट्रीय महामार्ग-33 वर ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात 10 जणांचा जागेवर मृत्यू झाला. त्या तीन च‍िमुरड्यांचा समावेश आहे. कार चालक सोडल्यास 9 जण एकाच कुटुंबातील आहेत. सर्वजण आरा (बिहार) हून व्रतबंधनाचा कार्यक्रम करून हटियाकडे (रांची) जात होते.


    ट्रक आणि कारचा समोरासमोर अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. तब्बल तीन तासांनी कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. सत्यनारायण सिंह (73), सत्यानारायण सिंह यांचा मुलगा अजीत कुमार सिंह (28), सत्यनारायण सिंह यांचा जावई मंटू कुमार सिंह (32), मंटू यांची पत्नी सरोज सिंह (30), सत्यनारायण सिंह यांचे दुसरे जावई सुबोध कुमार सिंह, पत्नी रिंकू, मंटू यांची मुलगी कली कुमारी (13), मुलगा रौनक कुमार (4), सुबोध यांची मुलगी रूही कुमारी (7) आणि कारच चालक अंचल पांडेय (33) अशी मृतांची नावे आहेत. आरा येथे मंटू कुमार सिंह यांच्या 4 वर्षीय मुलगा रौनक याच्या व्रतबंधनाचा कार्यक्रम होता.

    राँग साइडने जात होती कार..

    प्रत्यक्षदर्शिनी सांगितले की, पाटणा-रांची मार्गावर हा शनिवारी हा भीषण अपघात झाला. कार राँग साइडने जात होते. तितक्या समोरून आलेल्या भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. सर्व मृतदेह रामगड येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आले आहे.

  • Jharkhand news ramgarh road accident claims life of 10 of same family from ranchi

Trending