आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येपूर्वी पतिला व्हिडीओ कॉल करून म्हणाली- मी जीव देत आहे...पति धावत घटनास्थळी पोहचला परंतु तोपर्यंत बराच उशीर झालेला होता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोडरमा (झारखंड) - एका विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस अली.पोलिस घटनास्थळी पोहचले परंतु तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. टीट्टू मिस्त्री आणि पत्नी गुडिया यांचे आपसांत पटत नव्हते 6 महिन्यांपासून दोघांमध्ये सतत वाद होत असे .

 

आत्महत्येपूर्वी  केला होता पतिला व्हिडीओ कॉल म्हणाली मी जीव देत आहे
टिटू कामानिमित्त गॅरेज मध्ये गेला होता. सकाळी जवळपास 10 च्या सुमारास गुडियाने  व्हॉटसअप द्वारे व्हिडीओ कॉल केला आणि सांगितले मी आत्महत्या करत आहे. टिटू  धावत डोमचंच ठाण्यात पोहचला आणि घडलेल्या प्रकारची सर्व माहिती दिली.पोलीस अधिकारी विनोद कुमार यांना दिली. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडला परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी पती टिटूला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

 

आत्महत्येपूर्वी बाहिणिने केला होता भावाला कॉल
आत्महत्येपूर्वी  मृत गुडियाने आसनसोल येथे राहत असणाऱ्या भावाला देखील व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली होती. या प्रकरणाबाबद विचारले असता पोलीस अधिकारी विनोद कुमार यांनी अशी माहिती दिली की,पती आणि पत्नीमध्ये 6 महिन्यांपासून वाद होते. या वादामुळेच तिने आत्महत्या केली आहे. मृत गुडिया यांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे.      

 

बातम्या आणखी आहेत...