आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जमशेदपूर - अभिनेता रणवीर सिंह अभिनीत गुंडे चित्रपटाच्या स्टंटची कॉपी करणे दोन युवकांच्या जीवावर बेतले आहे. टाटा-खडगपूर रुळावर थांबलेल्या इंधनाच्या मालगाडीवर हे युवक एक शॉर्ट व्हिडिओ तयार करत होते. सोशल मीडिया अॅप टिक-टॉकवर हा व्हिडिओ अपलोड करून आपणही प्रसिद्ध होऊ असे त्यांना वाटत होते. परंतु, ज्या मालगाडीच्या छतावरून ते धावले त्यावर 25 हजार व्होल्टचे हायटेंशन वायर होते. त्याच वायरचा एका 11 वर्षांच्या आणि 13 वर्षांच्या मुलांना झटका बसला. झटका इतका जबरदस्त होता, की वेळीच दोघांच्या शरीरांनी पेट घेतला आणि होरपळून त्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी एक मुलगा तर पेटत असतानाही 700 मीटर पर्यंत धावला आणि एका मशीदीजवळ कोसळला.
अभिनेता रणवीर सिंह, अर्जुन कपूर आणि प्रियांका चोप्रा यांचा चित्रपट गुंडेच्या सीनची ते पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत होते. या चित्रपटात दोन्ही नायक एकमेकांचे हात धरून मालगाडीच्या छतावर धावतात. टाटा-खडगपूर रुळावर लाल सिग्नल लागताच एक इंधन घेऊन जाणारी मालगाडी थांबली. त्या सीनची पुनरावृत्ती करण्यासाठी रेहान आणि नावेद रेल्वेवर चढले. धावताना त्यांची नजर मालगाडीवर लटकणाऱ्या हायटेंशन तारांवर गेलीच नाही. त्यांचाच एक तिसरा मित्र फैसल सुद्धा त्याच ठिकाणी खाली थांबून व्हिडिओ शूट करत होता. त्यानेच पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. सुरुवातीला धावताना एकाचा हात हायटेंशन वायरला लागला. झटका इतका जबरदस्त होता की दुसरा मुलगा सुद्धा ओढला गेला. दुसऱ्याच क्षणी दोघांच्या शरीरांना आतून आग लागली. त्यांच्या समवेत फोनचा देखील कोळसा झाला.
अख्ख्या मालगाडीत भरले होते इंधन
रेल्वे पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटानगर रेल्वे स्टेशन परिसरात दोन अल्पवयीन मुलांचा जीव गेला. परंतु, आणखी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. मालगाडीला लागलेल्या प्रत्येक टँकरमध्ये पेट्रोल आणि डीझेल होते. मुलांची शरीर हायटेंशन तारांमुळे भस्म झाले. तरीही आग टँकरमध्ये पोहचली नाही. आगीची एक ठिणगीही एका टँकरमध्ये पोहचली असती तर गावभर मोठा स्फोट घडला असता. त्यातून कित्येक घरांना आग लागून शेकडो जणांचा मृत्यू झाला असता. याच रेल्वे स्टेशनला लागून रहिवासी परिसर आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.