आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jharkhand : Seven People Were Abducted And Killed After Protesting Against Pathalgadi Ritual

पत्थलगडीला विरोध केल्याने 7 जणांची अपहरणानंतर निर्घृण हत्या, मुख्यमंत्री सोरेन म्हणाले, 'दोषींवर कठोर कारवाई केली जाईल'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाईबासा : झारखंडमधील चाईबासा जिल्ह्यात पत्थलगडीला विरोध केल्याने ७ नागरिकांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप पत्थलगडी समर्थकांवर केला जात आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिली. मी या घटनेमुळे अत्यंत दु:खी आहे. कायदा सर्वांपेक्षा मोठा असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सोरेन यांनी सांगितले.

या घटनेवर मुख्यमंत्री सोरेन यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली. भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सोरेन यांनी म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी बुरगुलीकेला गावामध्ये पत्थलगडी समर्थकांनी एक बैठक बोलावली होती. गुलीकेलाचे उपसरपंच जेम्स भूड यांनी पत्थलगडी समर्थकांचा विरोध केला. यामुळे त्यांच्यासह सात जणांचे अपहरण केल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी भूड हे घरी न परतल्यामुळे, कुटुंबातील सदस्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुरू केलेल्या शोधमोहिमेनंतर मंगळवारी रात्री ७ जणांचे मृतदेह गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या घनदाट जंगलात सापडले.

अपर पोलिस महासंचालक मुरारीलाल मीणा यांनी सांगितले, गुलीकेरा तीन किलोमीटर दूर असलेल्या जंगलातून उपसरपंच जेम्स बूढ यांच्यासह ७ जणांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. गावकऱ्यांना लाठीने बेदम मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अनेक मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांना मंगळवारी या घटनेची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून, शोधमोहीम सुरू केल्याचे मीणा म्हणाले.


दरम्यान, पत्थलगडीचे समर्थन केल्यामुळे आतापर्यंत शेकडो जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, अनेकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत पत्थलगडीशी संबंधित सर्व गुन्हे मागे घेतले होते.

काय आहे पत्थलगडी?

पत्थलगडी आदिवासी समाजाची एक जुनी परंपरा आहे. यात झारखंडमधील काही आदिवासी परिसरात पत्थलगडी करून ग्राम सभाच सर्वात शक्तिशाली असल्याची घोषणा करतात. पण, आता काही लोकांनी यात बदल करून ही परंपरा आपल्या पद्धतीने राबवली आहे. यात आता एका मोठ्या चपट्या दगडाला जमिनीत गाडले जाते. तसेच, भारतीय संविधानातील कलमांची सोयीनुसार व्याख्या करत गावातील लोकांना सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यास भाग पाडले जाते.
 

बातम्या आणखी आहेत...