आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाकाहारी असूनही मित्रांसाठी मांसाहारी जेवण बनवतात झारखंडचे नवे मुख्यमंत्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका उत्तम चित्रकाराप्रमाणे ते ड्रॉइंग शीटवर पेन्सिलने समोर बसलेल्या व्यक्तीचे रेखाचित्र क्षणार्धात रेखाटतात. आपले बूट स्वच्छ ठेवतात, आपली कारही स्वत:च धुतात. हे व्यक्तिमत्त्व आहे झारखंडचे नवीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे. ते झारखंडमधील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबाशी संबंधित आहेत. हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिपद भूषवले आहे. हेमंत सोरेन यांनी २ वेळेस झारखंडचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते दुमका आणि बरहेट या दोन्ही मतदारसंघांतून निवडून आले आहेत. २०१४ मध्ये मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर हेमंत सोरेन सलग पाच वर्षे विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेते असूनही हेमंत सोरेन दुचाकीवर रांचीमध्ये फिरायचे. अशा वेळी त्यांना कोणीही ओळखू शकायचे नाही.  निवडणुकीनंतर त्यांचे एक छायाचित्र व्हायरल झाले, ज्यात ते सायकलवरून आपल्या मुलाला फिरवत होते. हेमंत एकत्रित कुटुंबात राहतात. त्यांची पत्नी कल्पना सोरेन रांचीत एक खासगी शाळा चालवतात. त्यांना निखिल व अंश ही दोन मुले आहेत. हेमंत यांना कुटुंबाला वेळ देणे, मुलांसोबत खेळायला आवडते. ते आपल्या पाळीव कुत्र्यावरही खूप प्रेम करतात. त्याचीही काळजी घेतात. त्यांचे जवळचे लोक सांगतात, हेमंत यांना पोळी फारशी आवडत नाही. त्यांना पराठ्यासोबत लोणचे खाण्यास आवडते. हेमंत हे शाकाहारी आहेत, पण मित्रांसाठी मांसाहारी जेवण बनवण्यास आवडते. हेमंत यांचा पोशाख सामान्य युवकांप्रमाणेच आहे. ते कधी जीन्स किंवा खादीचा कुर्ता, जीन्स किंवा टीशर्ट घालतात. हेमंत सोरेन यांचे प्राथमिक शिक्षण बोकारो येथे झाले. यानंतर १९९० मध्ये ते पाटण्यातील एमजी महाविद्यालयातून इयत्ता १० वी परीक्षा पास झाले. १९९४ मध्ये ते पाटणा हायस्कूलमधून इंटरमीजिएट परीक्षेत उत्तीर्ण झाले.  हेमंत यांनी १२ वीनंतर अभियांत्रिकीसाठी रांचीतील बीआयटीमध्ये प्रवेश घेतला, परंतु त्यांचे मन अभ्यासात रमले नाही. त्यांना वडिलांकडून राजकारणाचा वारसा मिळाला होता. अशा वेळी त्यांनी शिक्षण सोडले आणि २००३ मध्येे ते विद्यार्थी चळवळीशी जोडले गेले. २००९ मध्ये भाऊ दुर्गा सोरेन यांच्या मृत्यूनंतर हेमंत यांना सक्रिय राजकारणात यावे लागले. त्या वेळी त्यांच्या वडिलांचीही प्रकृती सतत बिघडायची. आता हेमंत सोरेन यांच्या वहिनी (दिवंगत दुर्गा सोरेन यांच्या पत्नी) आमदार आहेत. अशा वेळी ते राजकारणाचा वारसा चालवत आहेत. हेमंत यांना एक बहीण अंजली आणि एक लहान भाऊ बसंत सोरेन आहेत, ते देखील राजकारणात सक्रिय आहेत.

जन्म : १० डिसेंबर १९७५, रामगड

शिक्षण : इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडले.

संपत्ती : ८ कोटी ११ लाख रुपये

बातम्या आणखी आहेत...