आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिहादींना पाकमध्ये मुळीच थारा नाही : इम्रान खान, आंतरराष्ट्रीय दबावामुळे मांडली भूमिका,

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - जिहादी संघटना असतील किंवा जिहादी संस्कृती या दोन्ही गोष्टींना पाकिस्तानात मुळीच थारा नाही. सरकारने राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. त्यावर सर्वच पक्षांची सहमती झाली आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.  

 


खरे तर अफगाणिस्तानात सोव्हिएतच्या विरोधातील अमेरिकेच्या युद्धापासूनच प्रदेशात जिहादी संस्कृती व गट सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांचे अस्तित्व तेव्हापासूनचे आहे. अनेक दशकांपासून त्यांच्या कारवाया सुरू आहेत. परंतु आता पाकिस्तानात अशा संस्कृतीला थारा नाही. पाकिस्तान केवळ शांतताप्रियच नव्हे, तर जिहादी संस्कृतीचे उच्चाटन करण्यातही मागे-पुढे न पाहणारा देश आहे. त्यासाठी दहशतवादाच्या विरोधात अल्पकालीन तसेच दीर्घकालीन धोरणांची आखणी करण्यात आली आहे, असे इम्रान यांनी सांगितले.  सुरक्षा दलाने नियंत्रण रेषेजवळ अतिशय सतर्क राहिले पाहिजे. भारतातील निवडणूक पार पडत नाही. तोपर्यंत सीमेवर काय घडेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे सज्ज राहावे, असे इम्रान यांनी लष्कराला दिलेल्या आदेशात म्हटले आहे.  दहशतवादी मार्गावर असलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाकिस्तान सरकार मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करते, अशी माहितीही पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिली. भारत पाकिस्तानला आर्थिक कृती दलाच्या (एफएटीएफ) काळ्या यादीत ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच घडून आले तर पाकिस्तानसमोर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटे निर्माण होतील.गेल्या महिन्यात संघटनेने पाकला ग्रे यादीत कायम ठेवले होते. जैश-ए-मोहंमद, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई करण्यात अपयशी ठरल्यामुळे ग्रे यादीत कायम ठेवण्यात आले.  

 

 

‘लवकरच इंधनाचा जॅकपॉट, आर्थिक संकट दूर होईल’

पाकिस्तानला लवकरच इंधनाच्या रूपाने जॅकपॉट लागणार असल्याचे संकेत इम्रान यांनी शुक्रवारी दिले. अरबी समुद्रात तेल तसेच गॅसचा प्रकल्प होणार अाहे. त्याचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. त्यात पूर्ण यश आल्यास पाकिस्तानसमोरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल, असे इम्रान यांनी सांगितले. सागरी क्षेत्रातील शोधकार्य अंतिम टप्प्यात आले आहे. तेथे मोठा तेल साठा सापडण्याची चिन्हे आहेत. नैसर्गिक तेलाचा मुबलक साठा मिळावा. त्यामुळे पाकिस्तानचे संकट दूर होईल. या मुद्द्यावर इम्रान यांनी देशातील प्रमुख संपादकांशी अनौपचारिक चर्चा केली. तेव्हा त्यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली.
 

बातम्या आणखी आहेत...