आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिजा-शहाजीच्या लग्नाचा शाही थाट, महाराष्ट्राचा इतिहास घडवणारी सप्तपदी  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदवी स्वराज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यांना घडवणाऱ्या माऊलीचा इतिहास तितकासा परिचयाचा नाही . अवघ्या ८ व्या वर्षी न्यायाच्या बाजूने उभी राहणारी जिजा लहानपणापासूनच कर्तबगार होती. शिवबांवर झालेल्या स्वराज्याच्या संस्कारांचा पाया जिजाच्या बालपणीच घातला गेला होता. स्वराज्याच्या मोहिमेचा मानबिंदू ठरला तो जिजा-शहाजी यांचा विवाह सोहळा. जाधव आणि भोसले या राजघराण्यांमध्ये झालेली सोयरीक ही इतिहासातली खूप मोठी राजकीय घडामोड होती असे म्हणायला हरकत नाही.  १५०० सालचा तो काळ त्याकाळची अनिश्चित अशी परस्थिती आणि त्यात पार पडलेला एक ऐतिहासिक आणि अजरामर सोहळा.  सनई – चौघंड्यांचे सूर, केळीचे खांब आणि झेंडूच्या फुलांनी नटलेला दिव्य मंडप, शाही पक्वांन्नांनी सजलेलं ताट, दागिने, रोषणाई, सजावट, उंची वस्त्र असा शाही थाट होता जिजा-शहाजीच्या लग्नाचा. या शाही सोहळ्याचं पान इतिहासात आपण वाचलं  ही असेल पण  सोनी मराठीवर सुरू असलेल्या “स्वराज्य जननी जिजामाता” या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे . लाडक्या लेकीचं तळहात किती मऊ ,कुन्या राजाला कन्या देऊ... त्याकाळी लखुजी जाधव यांची अवस्था काहीशी या ओवीसारखी झाली असेल. आपलं काळीज सासरी पाठवताना वडील लखुजी यांची घालमेल होते आहे. जिजा-शहाजींच्या मिलनाने भोसले आणि जाधव या दोन मातब्बर घराण्यांची सोयरीक जुळणार आहे. महाराष्ट्राचा इतिहास घडवणाऱ्या जिजाऊ-शहाजीराजेंच्या मिलनाचा हा क्षण अगदी नजरेत साठवावा असाच असणार.   ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान संध्याकाळी ८.३० वाजता हळदीपासून लग्नापर्यंतचे सगळे विधी प्रक्षेपित केले जाणार आहेत. सोनी मराठीवर प्रक्षेपित होणाऱ्या या शाही विवाह सोहळ्याची अनेक वैशिष्ट्य आहेत . भोरच्या ऐतिहासिक वाड्यातील चित्रीकरण, इतिहासाचा साज चढलेले दागदागिने, पेहराव, रोषणाई, सजावट या सगळ्यांची ऐतिहासिक बांधणी या विवाह सोहळ्याचं आकर्षण ठरणार आहे. पीएनजी आणि सन्स यांनी खास या सोहळ्यासाठी त्याकाळातील असे खास दागिने तयार केले आहेत.