आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतर्फी प्रेमात मुलीवर केले 18 वार; म्हणाला, ती मला Blackmail करत होती! मग केले असेही काही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडवा - एका माथेफिरुने एकतर्फी प्रेमात अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर अचानक चाकूने सपा-सप वार केले. ती आपल्या मैत्रिणींसोबत शाळेत जात असताना आरोपीने तिला वाटेत धरून अचानक हा हल्ला केला. धक्कादायक दृश्य पाहून घाबरलेल्या तिच्या मैत्रिणींनी वेळीच तेथून पळ काढला. यानंतर तेथील दोन विद्यार्थ्यांनी गंभीर अवस्थेत मुलीला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांना तिच्यावर 2 तास शस्त्रक्रिया करावी लागली. तरीही अतीरक्तस्रावाने तिची स्थिती गंभीर आहे. या घटनेच्या 5 तासांनंतर आरोपीने स्वतःच्या पोटात आणि छातीवर सुद्धा चाकूने वार करून रुग्णालय गाठले आहे. 


पोट, गळ्यासह शरीरभर केले 18 वार...
> ही घटना मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात घडली आहे. येथे बुधवारी एक 13 वर्षांची मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत शाळेत जात होती. त्याचवेळी प्रदीप उर्फ छोटू (19) याने तिची वाट अडवली आणि अचानक धारदार शस्त्राने तिच्यावरप हल्ला सुरू केला. आरोपीने मुलीच्या पोट, पाठ, हात आणि गळ्यासह खांद्यावर 18 वार केले. यानंतर आरोपी छोटू घटनास्थळावरून पसार झाला. पीडितेच्या मैत्रिणी सुद्धा घाबरून पळाल्या. त्यांनीच शिक्षकांना या घटनेची माहिती दिली.
> त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या दोन युवकांनी तरुणीच्या घरी या घटनेची माहिती दिली आणि सर्वांनी मिळून तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अधिक रक्तस्राव झाल्याने तिची स्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आरोपी युवकाने सुद्धा स्वतःला जखमी केले. तसेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली असून त्याच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.


म्हणाला, मला ब्लॅकमेल करत होती...
घटनेच्या 5 तासांनंतर छोटूने स्वतःच्या पोटात चाकूने वार केले आणि रुग्णालयात दाखल झाला. आरोपीने सांगितल्याप्रमाणे, तो या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र, ती मुलगी याला कथितरित्या ब्लॅकमेल करत होती. त्यामुळेच तिच्यावर हल्ला केला. तिच्या वार केल्यानंतर आपण पळून गेले. परंतु, वाटेतच बेशुद्ध होऊन पडलो असे तो म्हणाला. शुद्धीवर आलो तेव्हा ती मुलगी गंभीर असल्याचे कळाले. त्यामुळे, स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे तरुणाने म्हटले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...