आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिओ फायबरच्या अॅनुअल प्लॅनवर कंपनी फ्री देत आहे 44990 रुपयांचा 4K टीव्ही, ऑनलाइन किंमत आहे 27990 रुपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- रिलायंसने आपल्या जिओ फायबर सर्व्हिस लॉन्च केली आहे. या सर्विसच्या वेलकम ऑफरमध्ये ग्राहकांना 3 हजारांपासून 45 हजारांपर्यंत फ्री गिफ्टदेखील मिळत आहे. म्हणजेच, एखादा ग्राहक जियो फॉरएवर अॅनुअल प्लॅन घेतो, तर त्याला स्पीकर पासून ते 4K टीव्हीपर्यंतचे गिफ्ट फ्री मिळेल. कंपनीने प्लॅन आणि गिप्टचे ई-ब्रोशर शेअर केले आहे. ज्यात फॉरएवर प्लॅन आणि फ्री गिफ्टच्या किमतीची माहिती आहे. पण, कंपनीने ज्या कीमतीत फ्री गिफ्ट देण्याचे बोलले आहे, त्याचा खुलासा कंपनीच्या एका ऑनलाइन रिलायंस डिजिटल स्टोरवर झाला आहे.

रिलायंस डिजिटल स्टोरवर स्वस्त आहेत फ्री प्रोडक्ट
जिओ फायबर वेलकम ऑफरच्या फॉरएवर एनुअल प्लॅनमध्ये कंपनी MUSE 2 स्पीकर, THUMP 2 (12W) स्पीकर, 24-इंच HD टीव्ही, 32-इंच HD टीव्ही आणि 43-इंच 4K टीव्ही फ्री देत आहे. यासाठी ग्राहकांना 2500 रुपये (सिक्योरिटी डिपॉजिट + इन्स्टॉलेशन चार्ज)सोबत मिनिमम 8388 रुपये आणि मॅक्सिमम 1,01,988 रुपये खर्च करावे लागतील. तेव्हाच फ्री प्रोडक्ट तुम्हाला मिळतील, पण या प्रोडक्टच्या ऑनलाइन किमतीत खूप अंतर आहे.

ब्रॉन्ज प्लॅनमध्ये MUSE 2 स्पीकर फ्री
जिओच्या फॉरएवर अॅनुअल प्लॅनची किंमत 10188 रुपये आहे. यात 100Mbps च्या स्पीडने 2400GB डेटा मिळेल. सोबतच, 12 वॉट चे THUMP 2 ब्लूटूथ स्पीकर फ्री मिळतील. जिओ या स्पीकरची किंमत 3999 रुपये सांगत आहे, पण रिलायंस डिजिटलवर हे 2499 रुपयात मिळत आहेत.

गोल्ड आणि डायमंड प्लॅनमध्ये 24-इंचचा फ्री टीव्ही
गोल्ड फॉरएवर अॅनुअल प्लॅनची किंमत 31,176 रुपये आहे. यात 250Mbps च्या स्पीडने 12000GB डेटा मिळेल. दुसरीकडे, डायमंड फॉरएवर अॅनुअल प्लॅनची किमंत 29,988 रुपये आहे. यात 500Mbps च्या स्पीडने 15000GB डेटा मिळेल. या दोन्ही प्लॅनसोबत 24-इंचचा HD टीव्ही फ्री मिळेल. जिओने या टीव्हीची किंमत 12,990 रुपये सांगितली आहे, पण रिलायंस डिजिटलवर हे 6,990 रुपयात मिळत आहे.

प्लॅटिनम प्लॅनमध्ये 32-इंचचा टीव्ही
या फॉरएवर अॅनुअल प्लॅनची किंमत 47,988 रुपये आहे. यात 1Gbps च्या स्पीडने 30000GB डेटा मिळेल. सोबतच 32-इंचचा HD टीव्ही फ्री मिळेल. जिओ या टीव्हीची किंमत 22,990 रुपये सांगत आहे, पण रिलायंस डिजिटलवर हा 8,990 रुपयात मिळत आहे.

टायटेनियम प्लॅनमध्ये 43-इंचचा टीव्ही फ्री
या फॉरएवर अॅनुअल किंमत किंमत 101,988 रुपये आहे. यात 1Gbps च्या स्पीडने 60000GB डेटा मिळेल. यासोबतच 43-इंचचा 4K टीव्ही फ्री मिळेल. जिओ या टीव्हीची किंमत 44,990 रुपये सांगत आहे, पण रिलायंस डिजिटलवर हा 27,990 रुपयात मिळत आहे.
 

पुढील स्लाइडवर पाहा फ्री प्रोडक्ट आणि खऱ्या किमती...

बातम्या आणखी आहेत...