• Home
  • Business
  • Jio GigaFiber service to be launched in 1600 cities broadband landline and TV combo for Rs 600

1600 शहरांमध्ये लॉन्च होईल Jio GigaFiber सेवा, 600 रूपयात मिळेल ब्रॉडबँड, लँडलाइन आणि टीव्ही कॉम्बो


टीव्हीवर मिळतील 600 चॅनल्स, ब्रॉडबँडची स्पीड असेल 1 GB प्रति सेकंद

दिव्य मराठी

Apr 24,2019 06:09:00 PM IST

नवी दिल्ली- मुकेश अंबानींची टेलीकॉम कंपनी Reliance Jio आपली GigaFiber FTTH सर्विसला देशातील 1600 शहरात लॉन्च करणार आहे. याच्या अंतर्गत ब्रॉडबँड-लँडलाइन-टीव्ही कॉम्बो फक्त 600 रूपयात मिळेल. या सेवेच्या अंतर्गत तुम्हाला स्मार्ट होम नेटवर्कमुळे अंदाजे 40 डिव्हाइस जोडण्याचे ऑप्शन मिळेल, त्यासोबत अनेक सुविधा मिळतील.

एका वर्षासाठी मिळेल फ्री सुविधा
livemint ने सांगितल्यानुसार, रिलायंस जियो आपल्या GigaFiber ची पायलट टेस्टिंग ननी दिल्ली आणि मुंबईमध्ये करत आहे. यात 100 मेगाबाइट प्रति सेकंदाच्या स्पीडने 100 Gigabytes डाटा मोफत मिळाणार आहे. यात एका वेळेस 4,500 रूपये राउटरसाठी चार्ज केले आहेत. यात टेलीफोन आणि टेलीव्हीजन सुविधा पुढील तीन महिन्यात जोडल्या जातील. जेव्हा या सुविधांना कमर्शिअल प्लॅटफॉर्मवर लॉन्च केली जातील तेव्हा या तिन्ही सुविधा एक वर्षांसाठी मोफत मिळतील.

एका नेटवर्कवर जोडल्या जातील 40ते 50 डिव्हाइस
लँडलाइनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग फॅसिलिटी मिळेल, तर टेलीव्हीजन चॅनल्सला इंटरनेटच्या माध्यमातून डिलीव्हर केले जाईल. या सगळ्या सुविधा Optical Network Terminal (ONT) बॉक्स राउटरमधून दिल्या जातील. यात एक मोबाइल, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेटसोबतच इथर 40 ते 50 डिव्हाइस कनेक्ट करता येतील. त्याव्यतिरीक्त गेमिंग, क्लोज्ड सर्किट टेलीव्हीजन आणि स्मार्ट होम सिस्टीम सामिल आहेत.


मिळतील 600 चॅनेल्स
या ट्रिपल कॉम्बोच्या अंतर्गत 600 चॅनल्सदेखील मिळतील, ज्यावर 7 दिवसांचा कॅच-अप ऑप्शन मिळेल. लँडलाइनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि ब्रॉडबँडमध्ये 100 mbps ची स्पीड मिळेल. याची किंमत 600 रूपये असेल. पण इतर सुविधांसाठी त्याचे वेगळे पैसे आकारले जातील.

X