आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षानिमित्त Jio चा आणखी एक धमाका, 399 च्या रिचार्जवर मिळणार 100% कॅशबॅक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या जिओ कंपनीने आणखी एक नवीन ऑफर आणली आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातील ही ऑफर देण्यात आहे. शुक्रवारी या धमाकेदार ऑफरची घोषणा करण्यात आली.  जिओ हॅप्पी न्यू इयर या नावाने ही ऑफर आहे. यामध्ये युझर्सना 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. पण हा कॅशबॅक AJIO कूपनच्या स्वरूपात मिळणार आहे. कंपनी 399 रूपयांच्या रिचार्जवर ही ऑफर देत आहे. 

 

ऑफरचा लाभ घेण्यासाठी 399 रूपयाचे रिचार्ज करणे अनिवार्य 

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी युझर्सना आपल्या जिओ नंबरवर 399 रूपयाचे रिचार्ज करावे लागणार आहे. रिचार्जनंतर जिओ अॅपमध्ये 399 रूपये जमा करण्यात येणार आहे. युझर्सना या कॅशबॅकचा AJIO अॅप किंवा वेबसाइटवरून कमीत कमी 1 हजार रूपयांची खरेदी केल्यावर लाभ घेता येणार आहे. 

 
ऑफर जुन्या आणि नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध 

Jio Happy New Year Offer जुन्या आणि नवीन दोन्ही युझर्ससाठी उपलब्ध आहे. 31 जानेवारी 2019 पर्यंत ही ऑफर सुरू असणार आहे. तर 15 मार्ज 2019 पर्यंत ग्राहकांना या कूपनचा फायदा घेता येणार आहे. 


जाणून न घ्या काय आहे AJIO 
AJIO हे 2016 मध्ये सुरू करण्याता आलेले रिलायन्सचे फॅशन बेस्ड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे ऑनलाइन खरेदी करण्यात येते. अंबानींनी हॅप्पी न्यू ऑफर लाँच करून एक दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...