आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गॅजेट डेस्क - रिलायन्स जिओने व्हिडिओ कॉलिंगसाठी जिओ टीव्ही कॅमेरा लॉन्च केला आहे. या कॅमेऱ्याच्या मदतीने टीव्हीद्वारे व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. हा कॅमेरा विशेषतः जिओफायबर ग्राहकांसाठी आणला आहे. या कॅमेराला जिओ सेट टॉप बॉक्सला कनेक्ट केल्यानंतर जिओकॉल अॅपच्या मदतीने व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. या द्वारे केलेली व्हिडिओ कॉलिंग टीव्हीवर फुल स्क्रीनमध्ये दिसेल.
इतकी आहे कॅमेराची किंमत
हा कॅमेरा कंपनीची अधिकृत वेबसाइट Jio.com वर डिव्हाइस सेक्शनच्या अॅक्सेसरीज सेक्शनमधून खरेदी करता येणार आहे. हा कॅमेरा कंपनीने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सादर केला होता. या कॅमेराची किंमत 2,999 रूपये निश्चित करण्यात आली आहे. ग्राहक EMI ने देखील हा कॅमेरा खरेदी करू शकता.
जिओ टीव्ही कॅमेराचे EMI प्लान
कॅमेराचे मासिक ईएमआय प्लान 141.17 रुपये पासून सुरू होतात. इंडसइंड, आयसीआयसीआय, अॅक्सिस, जम्मू आणि काश्मिर एचडीएफसी, आरबीएल, एसएसलबीसी, सिटी, कोटक महिंद्रा, स्टँडर्ड चार्टेड आणि एसबीआय बँकेच्या EMI वर खरेदी करता येईल.
ऑडियो कॉलला सुद्धा करणार सपोर्ट
हा कॅमेरा 120 डिग्री क्षेत्र व्यापतो. यामुळे अनेक लोक कॅमेरासमोर बसून व्हिडिओ कॉल करू शकता. जिओ नंबरसोबत इतर नेटवर्क किंवा लँडलाईनवर सुद्धा व्हिडिओ कॉल करता येईल. विशेष बाब म्हणजे याद्वारे व्हिडिओ कॉलसोबत ऑडियो कॉल सुद्धा करता येतो.
जिओफायबरचे प्लान
प्लान | डेटा | स्पीड |
699 रुपये | 150GB | 100 Mbps |
849 रुपये | 400GB | 100 Mbps |
1299 रुपये | 750GB | 250 Mbps |
2499 रुपये | 1500GB | 500 Mbps |
3999 रुपये | 2500GB | 1 Gbps |
8499 रुपये | 5000GB | 1 Gbps |
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.