Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | jio launches the jio kumbh featured phone

जिओकडून वैशिष्ट्यपूर्ण कुंभ जिओफोन सादर

प्रतिनिधी | Update - Jan 10, 2019, 10:24 AM IST

कुंभ जिओफोनमध्ये जियो ४ जी डेटासह कुंभमेळ्याबद्दल उपयुक्त माहिती उपलब्ध असणार

  • jio launches the jio kumbh featured phone

    नाशिक - स्मार्टफोन घेऊ न शकणाऱ्या लोकांना डिजिटल सेवांसह डिजिटली सक्षम बनविण्यासाठी जिओफोन सादर केल्यानंतर खास वैशिष्ट्यांसह कुंभ जिओफोन सादर करून जिओने आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे. कुंभमेळा मानवी इतिहासामधील जगातील सगळ्यात मोठा मेळावा असतो. त्यामध्ये १३ काेटी यात्रेकरू ५५ दिवसांत पवित्र स्नान करतात.

    कुंभ जिओफोनमध्ये जियो ४ जी डेटासह कुंभमेळ्याबद्दल उपयुक्त माहिती उपलब्ध असेल. कुंभ माहितीसह रिअल टाइम प्रवास (विशेष गाड्या, बस इ.), बुकिंग आणि त्यासंबंधी अपडेट्स, स्टेशनवर ट्रॅव्हलर हेल्पलाइन, आपत्कालीन हेल्पलाइन नंबर, क्षेत्र रस्ते आणि नकाशे, पूर्व प्रकाशित स्नान आणि धार्मिक दिवस कार्यक्रम, रेल्वे कॅम्प फेअर आणि बरीच माहिती त्यात आहे. बातम्या अलर्ट, इतर महत्त्वाच्या सूचना आणि घोषणा यांसारख्या अनेक बाबी मिळतील.

    विनामूल्य व्हॉईस कॉल, फ्री लोकल, एसटीडी आणि रोमिंग भारतातील कुठूनही कुठल्याही नेटवर्कवर कॉल, अमर्यादित इंटरनेट, सर्वोत्कृष्ट गुणवत्ता इंटरनेटसह जिओ सिनेमा, जियो संगीत, जिओगेम्स, फेसबुक, व्हाॅट्सअप, यू ट्यूब, नकाशे आणि इतर ऑफरमध्ये मिळणार आहे.

Trending