टेलीकॉम / जिओचा ग्राहकांना दणका; बंद केली फ्री कॉलिंग सर्व्हिस, 10 ऑक्टोबरपासून भरावे लागणार पैसे

दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी जिो ग्राहकांना टॉप-अप वाउचर घ्यावे लागेल

दिव्य मराठी वेब टीम

Oct 09,2019 08:19:54 PM IST

बिझनेस डेस्क- रिलायंस जिओने आता आपल्या ग्राहकांकडून पैसे घेणे सुरू केले आहे. जिओच्या ग्राहकांनी दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कवर कॉल केल्यावर त्यांना 6 पैसे प्रती मिनट चार्ज भरावा लागणार आहे. यासाठी इंटरकनेक्ट यूजेज चार्ज (आययूसी) टॉप-अप करावे लागेल. पण, जितक्याचे टॉप कराल, तितख्या व्हॅल्यूचा फ्री-डेटा देऊन कंपनी कंपेनसेट करत आहे. हा नियम 10 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

ग्राहकांना यापैकी टॉप-अप वाउचर घ्यावे लागेल

IUC टॉप-अप

IUC मिनीट

(नॉन-जिओ नेटवर्क )

फ्री डेटा (जीबी)

10 रुपये

124

1

20 रुपये

249

2

50 रुपये

656

5

100 रुपये

1,362

10


आययूसी चार्ज काय आहे?
टेलीकॉम कंपन्यांना एक-मेकांचा आययूसी चार्ज भरावा लागतो. हा चार्ज ग्राहकांद्वारे एक-दुसऱ्यांच्या नेटवर्कवर कॉल केल्यामुळे लागतो. जसे- जिओ ग्राहकाने एअरटेलवर कॉल केल्यावर जिओला अयरटेलला आययूसी चार्ज द्यावा लागतो. याचा रेट टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया(ट्राय)ने ठरवला आहे.


1 जानेवारी 2020 पासून आययूसी चार्ज बंद करण्य्चा प्रस्ताव होता
जिओकडून सांगण्यात आले की, सर्व इंटरनेट कॉल, इनकमिंग कॉल, जिओ टू जिओ कॉल आणि लँडलाइन कॉल आधीप्रमाणेच फ्री असतील. ट्रायने 1 ऑक्टोबर 2017 ला आययूसी चार्ज 14 पैशांवरुन 6 पैशांवर आणला आहे. एक जानेवारी 2020 पासून याला संपूर्ण बंद करण्याचा प्रस्ताव होता, पण ट्राय यावर परत कंसल्टेशन पेपर घेऊन आली.

X
COMMENT