आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमच्या अमिताभची 80 व्या वर्षीही भुरळ, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी जितेंद्र आव्हाड यांचे उद्गार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी पडझड झाली ती रोखण्याची गरज नाही. कारण पळणाऱ्यांचा इतिहास होत नसतो तर लढणाऱ्यांचा विजय महत्त्वपूर्ण असतो. शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन असून ते ८० व्या वर्षीही तरुणाईला भुरळ घालत आहेत. त्यांच्यासोबत जे नवीन चेहरे दिसत आहेत ते आश्वासक असून ते बदल घडवतील. नेते गेले की पक्ष संपतो हा भ्रम असून सत्तेसाठी जाणाऱ्या लोकांना पवार यांना थांबवायचे नव्हते, असे मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात नाेंदवले. आव्हाड म्हणाले, अॅड. प्रकाश आंबेडकर अकोल्यात दाेन वेळा लाेकसभा निवडणुकीत उभे राहिले तेव्हा त्यांना शरद पवार यांनी साथ दिली. आंबेडकर यांचा राेष राष्ट्रवादी काँग्रेसवर असला तरी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज असल्याने मी त्यांच्यावर टिप्पणी करणार नाही.

शिवसेनेला भाजपशी युती करणे अपरिहार्य
आव्हाड म्हणाले, शिवसेनेला भाजपने १०० जागा दिल्या तरी त्यांना स्वीकाराव्या लागतील. कारण संबंधित जागा स्वीकारल्या नाही आणि दाेघे स्वतंत्र लढले तर शिवसेना फुटेल. त्यामुळे शिवसेनेला भाजपशी युती करणे अपरिहार्य आहे. शरद पवार यांचा मी वारकरी असून विठ्ठलाप्रमाणे त्यांची सेवा करताे. महाराष्ट्राच्या राजकारणात पवार केंद्रबिंदू असून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा अथवा विराेध करा, पण त्यांना डावलून राजकारण हाेणार नाही ही वस्तुस्थिती आहे.

बातम्या आणखी आहेत...