आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जितेंद्र 74 किलोमध्ये एशियन स्पर्धेत खेळेल; जिंकल्यास सुशील होईल बाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जितेंद्र व सुशील 74 किलोत खेळतात; दुखापतीमुळे सुशील खेळणार नाही
  • जितेंद्रने फायनलमध्ये अमित धनकडला 5-2 ने हरवले

​​​​​​नवी दिल्ली : जितेंद्र कुमारने ७४ किलो गटात कुस्ती चाचणीत विजय मिळवला. त्याने या वर्षी होणाऱ्या पहिल्या क्रमवारी सिरीज आणि एशियन चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान निश्चित केले. जितेंद्रने चाचणीत फायनलमध्ये अमित धनकडला ५-२ ने हरवले.


दोन वेळेचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार दुखापतीमुळे ७४ किलो गटात चाचणीसाठी उतरला नाही. सुशीलने फेडरेशनला चाचणीची तारीख वाढवण्याची विनंती केली होती. मात्र, फेडरेशनने तारीख वाढवण्यास नकार दिला. आता जितेंद्र दोन्ही प्रकारात पदक जिंकण्यात यशस्वी ठरला तर, त्याला २७ ते २९ मार्चदरम्यान चीन येथे होणाऱ्या एशियन ऑलिम्पिक पात्रतेसाठी पाठवले जाईल. अशात सुशील ऑलिम्पिकच्या शर्यतीतून बाहेर होईल. क्रमवारी सिरीज १५ ते १८ जानेवारीदरम्यान इटली आणि एशियन चॅम्पियनशिप १८ ते २३ फेब्रुवारीदरम्यान नवी दिल्ली येथे होईल. महिला गटातील चाचणी शनिवारी लखनऊ येथे होईल, असे फेडरेशनने स्पष्ट केले.

ग्रीको रोमन खेळाडू

खेळाडू  : वज
ज्ञानेंद्र : ६० किलो
आशू ६७ : किलो
गुरप्रीत सिंह : ७७ किलो
सुनीलकुमार : ८७ किलो
हरदीप : ९७ किलो
नवीन : १३० किलो

सर्वाधिक ११ कुस्तीपटू या गटात उतरले होते

७४ किलो वजन गटात सर्वाधिक ११ मल्ल उतरले. राष्ट्रीय चॅम्पियन गौरव बलियान, अर्जुन यादव, प्रवीण मलिक, अमित धनकड, जितेंद्र, करण, संदीप, विशाल, विनोद कुमार, नवीन व प्रवीण राणाने सहभाग घेतला. अमितने उपांत्य फेरीत गौरवला ७-६ व जितेंद्रने विनोदला ६-१ ने हरवले. दुसरीकडे, ऑलिम्पिक पात्रता मिळवलेल्या दीपक पुनियाला ८६ किलो गटात व रवी दहियाला ५७ किलाे गटात थेट प्रवेश मिळाला. दीपकने पवन सरोहाला ६-२ ने सुमित मलिकने (१२५) सतेंद्रला व सत्यव्रत कादियानने (९७) मौसम खत्रीला हरवत फायनल जिंकली.

जितेंद्रला तंदुरुस्तीसाठी बजरंगने केली मदत

जितेंद्र गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपसाठी झालेल्या चाचणीत सुशीलकडून पराभूत झाला होता. चाचणीत जितेंद्र जखमी झाला होता. जितेंद्रच्या प्रशिक्षकांनी सुशीलने मुद्दाम डोळे व हातास दुखापत केली, असा आरोप केला होता. जितेंद्रने म्हटले, डोळ्याची दुखापत दोन आठवड्यांत बरी झाली. डाव्या हातावर रशियात जाऊन उपचार घेतले. त्याने म्हटले, रशियाचा संपूर्ण खर्च बजरंग पुनियाने केला. बजरंग पुनियाला देखील अशी दुखापत झाली होती, ज्यावर उपचार रशियात केले होते. जितेंद्र आणि बजरंग पुनिया एकमेकांचे सरावाचे सहकारी आहेत.

प्रदर्शनानंतर ऑलिम्पिक पात्रतेचा चाचणीवर निर्णय

कुस्ती फेडरेशने ऑफ इंडियाने (डब्ल्यूएफआय) पहिल्या चाचणीनंतर निवडलेल्या खेळाडूंना ऑलिम्पक पात्रतेसाठी पाठवणार असल्याचे म्हटले होते. फेडरेशनचे अध्यक्ष बृजभूषण सिंगने म्हटले, पहिल्या दोन प्रकारांत आमच्या खेळाडूंचे प्रदर्शन चांगले न राहिल्यास, पुन्हा चाचणी घेतली जाईल. आम्ही तेथे चांगले खेळाडू पाठवू इच्छितो. कारण जास्तीत जास्त कोटा मिळवता येईल. आम्ही कोणत्याही खेळाडूला चाचणी शिवाय पाठवणार नाही. खेळाडूंचा फिटनेस देखील महत्वाचा आहे. त्यांची तंदुरुस्ती देखील आम्ही पाहणार आहोत.