आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांपुढे जेएनयू प्रशासन नमले, शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्यापीठ प्रशासनाने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीची शिफारस
  • प्रस्तावित शुल्क जानेवारी २०२० पासून लागू होण्याची शक्यता

​​​​​​​नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सध्या सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी विद्यापीठाने नेमलेल्या ३ सदस्यांच्या समितीने वाढवलेले शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी युटिलिटी आणि सेवा शुल्क २ हजारांवरून कमी करून ५०० आणि सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक हजार करण्याचाही प्रस्ताव समितीने ठेवला आहे.

जेएनयू प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आता विद्यार्थ्यांना सेवा आणि युटिलिटी शुल्कात ५० टक्के सवलत मिळेल. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ७५ टक्के सवलत देण्यात येईल. प्रशासकीय समितीने १३ नोव्हेंबर २०१९ रोजी वसतिगृह नियमात आणि वसतिगृह शुल्कात वाढ करण्यास मंजुरी दिल्यानंतर जेएनयू प्रशासनाने यावर विचार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल सोमवारी सादर करण्यात आला.


विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे की, समितीने वसतिगृहातील अपेक्षित सेवा आणि युटिलिटी शुल्काची तपासणी केली असता दोन हजार रुपये दरमहा यात वीज आणि पाण्याच्या ३०० रुपयांसह आहे. हे शुल्क १ हजार रुपये दरमहा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हे नवीन शुल्क जेएनयू वसतीगृहात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त फायदा देत ७५ टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यांना आता २ हजार रुपयांऐवजी ५०० रुपये शुल्क द्यावे लागेल. जानेवारी २०२० पासून समितीने प्रस्तावित केलेले हे नवे शुल्क लागू होईल, असे बोलले जात आहे.

विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन
 
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या शुल्कवाढीविरोधात आणि वसतिगृह नियमावलीविरोधात विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांच्या संघटनांनी विशेषत: डाव्या संघटनांनी हे आंदोलन उभे केले. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने संसदेला घेराव घालण्यासाठी या विद्यार्थ्यांनी रॅली काढली होती. मात्र, पोलिसांनी काही अंतरावरच विद्यार्थ्यांना अडवले. या वेळी पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये जोरदार चकमक झाली होती. पोलिसांच्या कारवाईत काही विद्यार्थी जखमीही झाले होते. यावरून देशभरातून पोलिसांवर आणि प्रशासनावर जोरदार टीका झाली होती.
 
जेएनयू वसतिगृहात शुल्कवाढीविरोधात विद्यार्थ्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले होते.