आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • JNU : Seven People Were Identified In The Case Of Violence, With The Help Of Videos And Photographs

हिंसाचार प्रकरणी सात लोकांची ओळख पटली, व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या मदतीने पटली ओळख

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने आणखी सात जणांची ओळख पटवली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ जानेवारी रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचारात या सात जणांचा समावेश होता. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या माध्यमातून या लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, तपास पथकाने हिंसाचाराशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी साबरमती तसेच पेरियार वसतिगृहाचे अधीक्षक, काही सुरक्षा रक्षक आणि काही विद्यार्थ्यांचीही चौकशी करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी युनिटी अगेन्स्ट लेफ्ट नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या ६० पैकी ३७ सदस्यांची आधीच ओळख पटवली आहे. हा ग्रुप हिंसाचार झाला त्याच दिवशी म्हणजे ५ जानेवारी रोजी बनवण्यात आला होता. सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत पोलिसांनी ज्या नऊ विद्यार्थ्यांची ओळख पटवली आहे त्या सर्वांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची विद्यापीठ आवारातच चौकशी करण्यात येणार आहे. पोलिस लवकरच सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख पटवून इतर लोकांचीही चौकशी करणार आहेत.दरम्यान, कुलगुरू जगदेशकुमार यांनी सर्व काही विसरून जात नव्याने सुरुवात करण्याचे आवाहन केले आहे, तर विद्यार्थी संघ त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे. विद्यार्थी संघाने आधीपासून जेएनयू प्रशासनावर हिंसाचारात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. ५ जानेवारी रोजी सायंकाळी तोंडावर फडके घेतलेल्या हल्लेखोरांनी विद्यापीठ आवारात घुसून साबरमती वसतिगृहात तोडफोड करत विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. यात विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष आयेशा घोष आणि भूगोलाच्या प्रख्यात प्राध्यापिका सुचित्रा सेन यांच्यासह ३४ जण जखमी झाले होते.