आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयूमधील विद्यार्थ्याने केली आत्महत्या, मृत्यूपूर्वी शिक्षकाला ई-मेल करून लिहीले- 'मी मृत्यूला अनुभवायला जात आहे'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जवाहर लाल नेहरू विश्वविद्यालयच्या माही मंडवी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एम.एचा विद्यार्थी ऋषी जोशुआ थोमसने आत्महत्या केली आहे. त्याच्या या आत्महत्येनंत जेएनयू परत एकदा चर्चेत आले आहे. जोशुआ माही मंडवीच्या हॉस्टलमधील रूम नंबर 28 मध्ये राहत होता. शुक्रवारी स्कूल ऑफ लँग्वेजच्या रीडिंग रूममधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. मुळे केरळच्या रहिवासी असलेला ऋषी इंग्लिश विषयात एम.ए करत होता. 2017 पासून तो जेएनयूचा विद्यार्थी होता.

 

आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या एका शिक्षकाला ई-मेल केला होता. त्यात त्याने लिहीले होते, ‘जेव्हा तुम्ही हा ई-मेल वाचत असला, तोपर्यंत मी या जगात नसेल. मी मृत्यूचा अनुभव घ्यायला जात आहे.’ पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.


2016 मध्ये चाच हॉस्टलमधून बेपत्ता झाला आहे नजीब

2016 मध्ये याच हॉस्टलमधून नजीब अहमद नावाचा विद्यार्थी बेपत्ता झाला होता, त्याचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये. या घटनेमुळे जेएनयूमधील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांमुळे जेएनयू प्रशासन आणि विद्यार्थांना धक्का बसला आहे.2016 मध्ये नजीब बेपत्ता झाल्यानंतर 2017 मध्ये जेएनयूच्या एका 27 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती.